मुंबई : या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये 13 दिवस सरकारी आणि खासगी बँकांमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, फेब्रुवारीतील 12 दिवस बँका सुट्ट्यांमुळे बंद राहणार आहेत. त्याचबरोबर फेब्रुवारीमध्ये कामगार संघटनांनी दोन दिवस संपाची घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेब्रुवारीमध्ये, एकूण 12 दिवसांच्या बँक सुट्ट्यांपैकी (Bank Holidays in February) 4 सुट्ट्या रविवारी असतात. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्टीच्या यादीनुसार, या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या असताता. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी लागू होत नाहीत. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात.


बँक बंद असल्याने सर्वाधिक फटका अशा ग्राहकांना बसला आहे, ज्यांना स्वत: बँकेत जाऊन कामे करून घ्यावी लागतात. ऑनलाइन बँकिंग सेवा आठवड्याच्या शेवटीही सुरू राहतील, ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आरबीआयने अलीकडेच लागू केलेल्या नवीन नियमांमुळे NEFT आणि इतर ऑनलाइन चॅनेल सुट्टीच्या दिवशीही काम करतात.


2 दिवसांचा बँक संप


बँक कर्मचाऱ्यांनीही 23 फेब्रुवारी आणि 24 फेब्रुवारीला संपाची घोषणा केली आहे. सेंट्रल ट्रेड युनियन (CTU) आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) सह इतर संघटनांनी संयुक्तपणे बँक संपाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये देशभरातील सर्व सरकारी आणि खाजगी बँकांचा समावेश असेल. त्यामुळे संप झाल्यास 23 ते 27 फेब्रुवारी असे 4 दिवस कामकाज होणार नाही. कारण 23 आणि 24 फेब्रुवारीला संघटना संपावर राहिल्यास फेब्रुवारीत 23 ते 27 म्हणजे 5 दिवसांपैकी 4 दिवस बँकांमधील कामकाज ठप्प होणार आहे. 26-27 रोजी अनुक्रमे 23 आणि 24 आणि चौथा शनिवार आणि रविवारी संपामुळे बँकेचं काम कामकाज होणार नाही.