Bank News : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सध्या सर्वजण सज्ज झाले आहेत. तर, काहीजण या वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी काही कामं मार्गी लावण्यासाठी घाई करत आहेत. त्यातच बँकाच्या कामांसाठी अनेकांचीच लगबग पाहायला मिळत आहे. तुम्हीही बँकांची काही कामं नव्या वर्षातील जानेवारी महिन्यात ढकलताय का? असं करणं तुम्हालाच महागात पडू शकतं. कारण, 2024 च्या जानेवारी महिन्यामध्ये साधारण 16 दिवसांसाठी बँका बंद राहणार आहेत. थोडक्यात या दिवसांना बँकांचं कामकाज होणार नाहीये, त्यामुळं खातेधारकांच्या अडचणी वाढू शकतात. बँका नेमक्या कोणत्या दिवशी बंद असतील याची सविस्तर माहिती RBI च्या वतीनं देण्यात आली आहे. 


वर्षभराच्या कामकाजाची सुरुवातच सुट्टीनं... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षीप्रमाणं यंदाही वर्षाच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात ही सुट्टीनं होणार आहे. 1 आणि 2 जानेवारीला बँका बंद राहतील. आरबीआयकडून  Bank Holiday List  मध्ये यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. जिथं जानेवारीमध्ये मकर संक्रांत, प्रजासत्ताक दिन अशा दिवशी बँका बंद असतील. भारतात बँका 16 दिवसांसाठी बंद राहणार असून यामध्ये 6 सुट्ट्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार- रविवारच्या असतील याची नोंद घ्यावी. 


हेसुद्धा वाचा : Ayodhya Ram Mandir Exclusive : रामाच्या नगरीतून थेट तुमच्यासाठी... पाहा असं असेल राम मंदीर!


बँकांच्या सुट्ट्यांची यादी... 


(https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx) इथं तुम्ही आरबीआकडून जाहीर करण्यात येणारी सुट्ट्यांची यादी पाहू शकता. दरम्यान जानेवारी महिन्यामध्ये खालील दिवशी बँकांचं काम बंद राहणार आहे. 


1 जानेवारी, नव्या वर्षाचा पहिला दिवस - ऐजावल, चेन्नई, गंगटोक, इंफाल, ईटानगर, कोहिमा, शिलाँगमधील बँकांना रजा 
2 जानेवारी, नव्या वर्षाचा सोहळा - ऐजावल
7 जानेवारी, साप्ताहित सुट्टी - संपूर्ण देशभरातील बँका बंद 
11 जानेवारी, मिशनरी दिवस- ऐजावलमधील बँकांना सुट्टी 
13 जानेवारी, दुसरा शनिवार- देशभरातील बँका बंद 
14 जानेवारी, रविवार - देशभरातील बँकांना रजा 
15 जानेवारी, मकर संक्रांत, पोंगल, बिहू, उत्तरायण- बंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहटी, हैदराबाद आंध्रप्रदेश आणि तेलंगणा 
16 जानेवारी, तिरुवल्लुवर दिवस- चेन्नई 
17 जानेवारी, उझावर थिरुनल- चेन्नई 
21 जानेवारी, रविवार- देशभरातील बँका बंद 
22 जानेवारी, इमोइनु इरत्पा- इंफाळ 
23 जानेवारी, गान-नगाई- इंफाळ
25 जानेवारी, प्रजासत्ताक दिन - देशभरातील बँका बंद 
27 जानेवारी, चौथा शनिवार- देशभरातील बँका बंद 
28 जानेवारी, रविवार - देशभरातील बँका बंद