BOI Home Loan Process: तुम्ही घर घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक BOIने घर घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी दिलेय. बँक ऑफ इंडियाने (Bank Of India) आपल्या गृहकर्जावरील व्याजदरात (Home Loan Interest Rate) कपात केली आहे. बँक ऑफ इंडियाकडून स्टार होम लोन वार्षिक 8.30 टक्के दराने मिळू शकते. त्याचा सर्वात स्वस्त EMI असणार आहे. (Bank of India (BOI) cuts home loan interest rates to 8.30%)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक ऑफ इंडियाने (BOI) आपल्या गृहकर्जावरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली. त्यामुळे घर घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. बँकेने BOI स्टार होम लोन योजनेसाठी व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. ज्यात आता आदर्श स्पर्धात्मक व्याजदर वार्षिक 8.30 टक्के आणि सर्वात कमी EMI सह सुरु झाले आहेत. 


सध्या अनेक बँकांनी आपल्या होम लोनच्या व्याज दरात वाढ केली आहे. ज्यांना आपला घराचा हप्ता कमी करायचा असेल त्यांनी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कर्ज घेतले आणि ग्राहक इतर बँका किंवा वित्तीय संस्थांमध्ये सुरु असलेली त्यांची गृहकर्जे बँक ऑफ इंडियामध्ये हस्तांतरित करु शकतात. बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, गृहकर्ज अर्जदाराला ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. तर लोक कमी व्याजदराचा फायदा, लिक्विडिटी आणि टॅक्स सूट या तीन फायद्यांचा लाभ घेऊ शकतात. घर बांधणे, प्लॉट खरेदी करणे, नवीन किंवा जुना फ्लॅट खरेदी करणे, नूतनीकरण किंवा दुरुस्तीसाठी या ऑफरचा लाभ घेता येईल. बँक ऑफ इंडिया स्टार होम लोन कर्जाची परतफेड करण्यासाठी 30 वर्षांची मुदत देते. 


हे फायदे मिळवा


या  होमलोनअंतर्गत, कर्जाच्या कालावधीत वेगवेगळ्या कालावधीत ईएमआय भरण्याचे अनेक पर्याय आहेत, जेणेकरून ग्राहकावर जास्त दबाव येऊ नये. यासाठी कोणतेही प्रीपेमेंट किंवा आंशिक पेमेंट शुल्क आकारले जात नाही आणि कर्जदाराला भरलेल्या व्याज आणि हप्त्यांवर देखील कर सूट दिली जाते. ग्राहकांवर कोणताही बोजा पडत नाही आणि त्यांना कमी व्याजाची रक्कम भरावी लागत असल्याने व्याज रोज मोजले जाते. एवढेच नाही तर बँक ऑफ इंडिया फर्निचर लोन आणि टॉप अप सुविधा देखील देते. ही ऑफर बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. कर्ज मंजुरीची प्रक्रिया देखील खूप सोपी आहे. 


बँक ऑफ महाराष्ट्राचे होम लोन महाग


दुसरीकडे, बँक ऑफ महाराष्ट्राने (BOM)  निवडक मुदतीच्या कर्जासाठी व्याजदर (MCLR) वाढवला आहे. बँकेने बुधवारी सांगितले की, एक वर्षाचा MCLR 7.80 टक्क्यांवरुन 7.90 टक्के करण्यात आला आहे. ऑटो, पर्सनल आणि होम लोन यांसारख्या ग्राहक कर्जावर समान व्याज आकारले जाते. बँकेच्या म्हणण्यानुसार, सुधारित MCLR 7 नोव्हेंबर 2022 पासून लागू झाला आहे. त्याचवेळी, एक महिन्याचा MCLR 0.05 अंकांनी वाढवून 7.50 टक्के करण्यात आला आहे. याशिवाय एक दिवस, तीन आणि सहा महिन्यांच्या मुदतीच्या कर्जाच्या व्याजदरात बदल करण्यात आलेला नाही.