मुंबई : एटीएममधून पैसे काढणं आता कमी होऊ शकतं. कारण आता एटीएममधून पैसे काढण्यावर तुम्हाला काही पैसे मोजावे लागणार आहेत. बँकांनी फ्री सर्विस बंद करण्याचं ठरवलं आहे. आतापर्यंत महिन्याभरात एटीएममधून 3 वेळा फ्रीमध्ये पैसे काढता येत होते. पण आता त्यावर सर्विस चार्ज लागणार आहे. SBI, HDFC, ICICI, AXIS आणि कोटक महिंद्रा बँक ग्राहकांकडून हे पैसे वसूल करु शकते.


बँकांवर ताण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँकेकडून ATM मधून पैसे काढणे, लॉकर विजिट आणि अनेक सेवा मोफत दिल्या जात होत्या. पण आता या सर्विस महागणार आहेत. बँकांनी सर्विस चार्ज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत या सेवांसाठी बँकांना जवळपास 40 हजार कोटी रुपये मोजावे लागत होते. राजस्व विभाग आणि अर्थ खात्याला बँकांनी सूट देण्याची मागणी केली होती.


PMO मध्ये पोहोचलं प्रकरण


मीडिया रिपोर्टनुसार, हे प्रकरण आता पंतप्रधान कार्यालयात पोहोचलं आहे. या समस्येवर समाधानासाठी बँक आणि अर्थ खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली. यावर याच आठवड्यात निर्णय होऊ शकतो.


ग्राहकांना एटीएम ट्रांजेक्शन, फ्यूल सरचार्ज रिफंड, चेक बुक, डेबिट कार्ड सारख्या सेवा आता मोफत नाही मिळणार. टॅक्स डिपार्टमेंटने 40 हजार कोटींचा टॅक्स मागितला आहे. बँका आता हा टॅक्स ग्राहकांकडूनच वसूल करण्याच्या विचारात आहे.


बँकांना नोटीस


राजस्व विभागाने बँकिंग सेवेवर सर्विस टॅक्स शिवाय त्यावरचं व्याज देखील जमा करण्यास सांगितलं आहे. हा सर्विस टॅक्स त्या गोष्टींवर लावला जातो जो ग्राहकांना बँकेकड़ून मोफत मिळतं.


कोणत्या सेवांवर लागणार चार्ज


ATM मधून पैसे काढल्यास
चेकबुक सेवा
कॅश जमा करण्याची सेवा
लॉकर व्हिजिट सेवा
मिनिमम बँलेंस 
जन धन योजना