नवी दिल्ली : सोशल मीडियात ५०० आणि २००० रूपयांच्या नोटा बंद होण्याची कथित बातमी व्हायरल होत आहे. आरबीआयने याबाबत आदेश काढलाय, असेही सांगण्यात येत आहे. पण हे पूर्ण सत्य नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटा बंद होणार नाहीत, त्या अमान्य होतील. असेही होऊ शकते की, या नोटा बाजारात चालू राहतील, पण बॅंकेत चालणार नाहीत. नोटाबंदीनंतर जारी करण्यात आल्यावर नवीन नोटासंबंधी आरबीआयने स्पष्ट केले होते की, जर नोटांवर कोणताही संदेश, राजकीय किंवा आक्षेपार्ह शब्द लिहिलेला दिसेल तर बॅंक ते स्विकारणार नाही.  


सोशल मीडियात काय व्हायरल होतंय?


गेल्या काही दिवसांपासून लगातार २००० च्या नोटा बंद होण्याची चर्चा होतीये. पण यावेळी हे व्हायरल झालं की, आयबीआयने आदेश दिलाय की, नवीन नोटा पूर्णपणे रद्दी होतील. यात धार्मिक, राजकीय, उद्योग किंवा कोणताही आक्षेपार्ह शब्द असलेल्या नोटा बॅंक घेणार नाही. एका यूजरने तर हे गुजरात निवडणुकीसोबत जोडलं. त्याने लिहिले की, लवकरच या नोटा बंद होतील. त्यामुळे लवकर नोटा बॅंकेत जमा करा. दरम्यान, आयबीआयने एका मीडिया हाऊस सोबत बोलताना सांगितले की, ज्या नोटांवर काहीही आक्षेपार्ह लिहिलेलं असेल तर आरबीआयच्या मास्टर सर्कुलरमध्ये अशा नोट मान्य केल्या जाणार नाहीत.


नवीन नाही हा नियम


नोटा मान्य न होण्याचा हा नियम नवीन नाहीये. नोटाबंदी २०१६ नंतर आरबीआयने ‘एक्सचेंज ऑफ नोट्स’ नोटीफिकेशनमध्ये हा नियम जारी केला होता. आरबीआयचं हे नोटीफिकेशन त्यांच्या वेबसाईटवरही आहे. आरबीआयने स्पष्ट केलं की, सोशल मीडियातून केले जात असलेले असे दावे खरे नाहीयेत. आरबीआय असे नियम जारी केल्यावर त्याचं नोटीफिकेशन मीडियात देतो. अशा नोटांसंदर्भातही २०१६ मध्ये नियम करण्यात आला होता. 


१००० ची नवीन नोट व्हायरल


सोशल मीडियात १ हजाराच्या नवीन नोटेवरूनही चर्चा रंगली आहे. पण आरबीआयने आधीच स्पष्ट केले होते की, १ हजाराच्या नवीन नोटा येणार नाहीत. सोशल मीडिया व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये सांगण्यात आलंय की, १ हजार रूपयांच्या नव्या नोटा १ जानेवारी २०१८ पासून बाजारात येतील. याआधीही जून २०१७ मध्येही असेच दावे करण्यात आले होते. मात्र आरबीआयने नेहमीच अशा बातम्यांचे खंडन केले आहे.