काम बंदं, सुट्टी सुरु, पुढील आठवड्यात बँक व्यवहार इतके दिवस बंद
पण या आठवड्यातही सुट्ट्यांचा सिलसिला चालू आहे.
Bank Holiday This Week:तुमची बँकेशी संबंधित काही कामं असतील तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. यावेळी ऑगस्ट महिन्यात अनेक सण येत असल्याने बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी तुम्ही नक्की पाहून घ्या. ऑगस्ट महिन्यात सणांमुळे 18 दिवस बँका बंद राहणार होत्या त्यापैकी अनेक सुट्ट्या निघून गेल्या आहेत. पण या आठवड्यातही सुट्ट्यांचा सिलसिला चालू आहे.
असे असले तरी तुम्ही ऑनलाईन सुविधांचा लाभ घेऊ शकता. सणांच्या निमित्ताने ऑगस्ट महिन्यात एकूण 18 दिवस बँकांना सुट्ट्या आहेत. यात शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुटी देखील समाविष्ट आहे. बँकेच्या सुट्ट्यांमुळे तुम्ही ऑनलाइन सुविधांचा लाभ घेऊ शकता.
कोणत्या दिवशी बँका बंद राहतील?
13 ऑगस्ट 2022 - दुसऱ्या शनिवारमुळे सुट्टी असेल
14 ऑगस्ट 2022 - रविवारमुळे बँका बंद राहतील
15 ऑगस्ट 2022 - स्वातंत्र्य दिन
16 ऑगस्ट 2022 - पारशी नववर्ष (मुंबई-नागपूरमध्ये बँका बंद राहतील)
18 ऑगस्ट 2022 - जन्माष्टमी (सर्वत्र सुट्टी)
19 ऑगस्ट 2022 - जन्माष्टमी श्रावण (अहमदाबाद, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, गंगटोक, जयपूर, जम्मू, गतना, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर येथे बँका बंद राहतील)
20 ऑगस्ट 2022 - कृष्णा अष्टमी (हैदराबादमध्ये बँका बंद राहतील)
21 ऑगस्ट 2022 - रविवार (साप्ताहिक सुट्टी)