नवी दिल्ली:  एप्रिल 2021 पासून मोठ्या सरकारी बँकांचे विलीनीकरण होणार आहे. आठ बँकांतील ग्राहकांचे खाते क्रमांक बदलू शकतात. या बँकांमध्ये  देना बँक, विजया बँक, आंध्रा बँक, सिंडिकेट बँक, ओऱिएंटल बँक  ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि अलाहाबाद बँक आहेत. या बँकांच्या खातेदारांना नवीन चेकबुक आणि पासबुक घ्यावे लागणार आहे. या बँकांधील ग्राहकांचे जुने पासबुक आणि चेकबुक बाद होणार आहेत.
  


या बँकेच्या खातेदारांनी काय करावे?


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    जर तुम्ही वरील पॅसेजमध्ये नमूद केलेल्या बँकाचे ग्राहक असाल तर तुमचा मोबाईल नंबर, पत्ता, नामनिर्देशित व्यक्तिचे नाव, इत्यादी माहिती बँकेत पुन्हा अपडेट  करणे आवश्यक असेल.

  • बँकांच्या विलीनिकरणामुळे तुम्हाला तुमच्या जुन्या बँकांचे नवीन चेकबुक आणि पासबुक मिळवावे लागतील.

  • नवीन चेकबुक आणि पासबुक मिळवल्यानंतर तुम्हाला तुमच्या विविध ठिकाणी दिलेल्या बँकींग डिटेल अपडेट करणे आवश्यक असेल