मुंबई : जर तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये काम करताय अथवा या क्षेत्रात तुम्हाला करियर करायचे आहे तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सिटीबँकेचे माजी सीईओ विक्रम पंडित यांच्यामते पुढील ५ वर्षात बँकिंग सेक्टरमध्ये ३० टक्के नोकऱ्या संपुष्टात येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तंत्रज्ञानात होत असलेले आधुनिकीकरणामुळे या क्षेत्रातील नोकऱ्यांवर गदा येणार आहे. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विक्रम पंडित त्यांनी ही माहिती दिली. ज्याप्रकारे बँका आर्टिफिशियल इंटेलिजंस आणि रोबोटिक्सचा वापर करत आहेत त्यानुसार नोकरीच्या संख्या कमी होऊ शकतात. 


बँकिंग क्षेत्रात तंत्रज्ञानात सतत सुधारणा होत असते. आता लोकांनीही इंटरनेट तसे मोबाईल बँकिंगची सुविधा वापरण्यास सुरुवात केलीये. चेकबुकही घरबसल्या मिळते. याशिवाय पासबुकमध्ये एंट्री करण्यासाठीही तुम्हाला बँकेत जावे लागत नाही. तुम्ही ऑनलाईन तुमच्या खात्याची सर्व माहिती मिळवू शकता. या सगळ्या सुविधांचा परिणाम बँक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर होऊ शकतो.