नवी दिल्ली : येत्या काळात बँकांमध्ये रक्कम भरणाऱ्या खातेदारांना खुशखबर मिळू शकते, अशी शक्यता 'इक्रा'नं (Investment Information & Credit Rating Agency)  व्यक्त केलीय. 'इक्रा' ही एक माहिती आणि पत रेटिंग एजन्सी आहे.


व्याज दर वाढणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इक्रा'च्या मारहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत बँकांमध्ये जमा रक्कमेच्या तुलनेत कर्जाऊ रक्कमेच्या संख्येत कमालीची वाढ झालीय. यामुळे बँकांना मिळणाऱ्या व्याजातही वाढ होणार आहे. त्यामुळेच येणाऱ्या काळात बँकेत जमा पैशांवर व्याज दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.   


अधिक वाचा : एक असाही मुख्यमंत्री ज्यांनी आजपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केलंच नाही...


सद्य वित्तीय वर्षात पाच जानेवारीपर्यंत कर्ज २.०२ लाख करोड रुपये आहे. तर या काळात १.२७ लाख करोड रुपये बँकांत जमा झाले होते. 


कर्जाच्या रक्कमेत होणार वाढ?


२९ सप्टेंबर २०१७ ते ५ जानेवारी २०१८ दरम्यान बँकांकडून दिल्या गेलेल्या कर्जाची रक्कम १.८५ लाख करोड रुपये होती... तर ३०,००० करोड रुपये बँकांत जमा झाले होते. अर्थात, याही काळात कर्जाची रक्कम जमा रक्कमेहून अधिक होती. 


अधिक वाचा : ३ लाखांपर्यंतचं उत्पन्न होऊ शकतं टॅक्स फ्री, कंपनी करातही कपातीची शक्यता


पुनर्गुंतवणूकीद्वारे सरकारनं बँकांत ८८,१३९ करोड रुपये दिले आहेत. यामुळे आगामी महिन्यांत सरकारी बँकांमध्ये कर्जाच्या रक्कमेतही वाढ होऊ शकते. 


अधिक वाचा : बजेट 2018: अर्थमंत्री करु शकतात हे 5 मोठे बदल