नवी दिल्ली: तुम्हाला रोखीने व्यवहार करण्याची सवय असेल आणि त्यासाठी तुम्ही जर एटीएममधून पैसे वारंवार काढत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. अनेक बँकांनी आरबीआयकडे एटीएममधून काढल्या जाणाऱ्या पैशांवर अधिक शूल्क आकारण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे. एटीएम अपग्रेडेशनमुळे वाढणाऱ्या आर्थिक बोजा वाढत असल्यामुळे बँकांनी ही मागणी केली आहे. आपल्या डोक्यावरचा भार ग्राहकांच्या माथी मारण्यासाठी बँकांनी प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, आरबीआयने बँकांच्या या मागणीला अद्याप तरी मान्यता दिली नाही. 


दोन पद्धतीने शुल्क वाढण्याची शक्यता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएम अपग्रेडेशनसाठी आलेला खर्च वसूल करण्यासाठी बँक एटीएम ट्रँजेक्शन चार्जमध्ये दोन पद्धतीची वाढ होऊ शकते. पहिले फ्री ट्रांजेक्शन संपल्यावर वसूल केल्या जाणाऱ्या शुल्कात १८ रूपयांऐवजी २३ रूपये अशी वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय एटीएममधून केले जाणारे फ्री ट्रांजेक्शनमध्येही घट केली जाण्याची शक्यता आहे. खासगी बँकांनी आता पर्यंत एटीएमची पहिली ३ ट्रांजेक्शन्स फ्री ठेवली आहेत. तर काही खासगी बँकांनी पहिली ५ ट्रांजेक्शन फ्री द्यायची सुविधा दिली आहे. 


किती वाढू शकते ट्रांजेक्शन


एटीएममधून ट्रांजेक्शन करण्यावर कमीत कमी ३ ते ५ रूपयांची वाढ होऊ शकते. ही वाढ केल्याने एटीएम ऑपरेटर्स म्हणजेच बँक अपग्रेडेशचा पडणारा बँकांवरील बोजा कमी होऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार आरबीआयने अत्यंत कठोर अशी मार्गदर्शक रेखा आखली आहे. त्यामुळे ग्राहकांकडून अधिकची शूल्कवसूली न केल्यास बँकांना मोठा तोटा होऊ शकते.