मुंबई : ऑक्टोबर महिना संपत आला आहे. या महिन्यातील सणांनी देखील निरोप घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यात तब्बल 11 दिवस बँका बंद होत्या. आता नवीन महिना आणि नवीन कामांच नियोजन सुरू झालं असेल. तर या नियोजनापूर्वी जाणून घ्या नोव्हेंबर महिन्याचं शेड्युल. नोव्हेंबर महिन्यात देखील 8 दिवस बँका बंद राहणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या सुट्या 
नोव्हेंबरमध्ये सणासोबतच दुसऱ्या आणि चौथ्या महिन्यातील सुट्या मिळून 8 सुट्या आहेत. यामुळे बँकांशी संबंधीत सर्व काम वेळेत करून घ्या. नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच 1 नोव्हेंबर रोजी बंगळुरू आणि इम्फालमध्ये कन्नड राज्योत्सव असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत. 


यानंतर 2 नोव्हेंबर रोजी पटना आणि रांचीमध्ये छठ पूजेच्या कारणाने बँका बंद राहणार आहेत. 8 नोव्हेंबर रोजी शिलाँगमध्ये वांग्ला फेस्टिवल असल्यामुळे स्थानिक बँका बंद राहणार आहेत. 9 नोव्हेंबरला महिन्याचा दुसरा शनिवार असल्यामुळे बँका बंद राहतील. तसेच 12 नोव्हेंबर रोजी गुरूनानक जयंती असल्यामुळे बँका बंद राहतील. 


15 नोव्हेंबर रोजी बंगळुरू, जम्मू आणि श्रीनगरमध्ये कनकदास जयंती आणि ईद-उल-मिलाद-उल-नबी कारण बँका बंद राहणार आहेत. 23 नोव्हेंबर रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्यामुळे बँका बंद राहतील. यामुळे आपापल्या राज्यातील सुट्या लक्षात घेऊन सर्व व्यवहार करा.