Barbeque Nation IPO | धमाकेदार कमाई करून देणारा आयपीओ आजपासून खुला; जाणून घ्या सविस्तर
आयपीओमध्ये (IPO) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली संधी चालून आली आहे
नवी दिल्ली : आयपीओ (IPO) मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली संधी चालून आली आहे. रेस्टॉरंट साखळी असलेल्या बार्बिक्यू नेशन (Barbeque Nation IPO) चा आयपीओ 26 मार्चपर्यंत सबस्क्राईब करता येणार आहे.
या आयपीओच्या माध्यमांतून कंपनीला 180 कोटी रुपये उभे करायचे आहेत. बार्बिक्यू नेशनच्या आयपीओची प्राईस बँड 498-500 रुपये आहे. तर आयपीओची लॉटसाईज 30 इतकी आहे. एका लॉटसाठी साधारण 15000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
बार्बिक्यू नेशनच्या आयपीओतील विशेष बाब म्हणजे या कंपनीत दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या एल्केम कॅपिटल आणि खासगी इक्विटी फर्म सीएक्सची गुंतवणूक आहे.
बार्बिक्यू नेशन काय आहे.?
बार्बिक्यू नेशनची स्थापना 2006 साली झाली. कंपनीने आपले पहिले रेस्टॉरंट 2008 साली सुरू केले. सध्या भारतात 138, मलेशियात 1, युएई 5, ओमान 1 शाखा कार्यरत आहेत. आर्थिक वर्ष 2020 मध्ये कंपनीची उलाढाल 850 कोटी इतकी होती.