मुंबई : Basmati Rice : बासमती तांदूळ महागला आहे. वर्षभरात क्विंटलमागे1400 रुपयांची वाढ झाली आहे. (Basmati rice becomes expensive) इराण आणि सौदी अरेबियातून बासमती तांदळला मागणी वाढत असून बासमतीचे दर वाढत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परदेशातून बासमती तांदळाची मागणी वाढत असून बासमतीचे भाव वाढत आहेत. बासमतीचा जुना साठा बाजारात शिल्लक राहिल्याने नवीन हंगाम येईपर्यंत बासमतीच्या दरात वाढ होणार आहे.बासमतीची लागवड उत्तरेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. सध्या तेथील शेतकऱ्यांना भात उपलब्ध नाही.  परदेशातून बासमतीला मागणी वाढत आहे. बासमती 1509 (धान) जातीला एक वर्षापूर्वी 2,600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता, असे पुणे येथील मार्केट यार्डातील तांदूळ व्यापारी राजेंद्र बाठिया यांनी सांगितले.


बासमतीचा जुना साठा बाजारात शिल्लक असल्याने नवीन हंगामातील आवक होईपर्यंत बासमतीचे दर तेजीत राहणार आहेत. गेल्यावर्षी प्रकारच्या भाताची लागवड 26 ते 27 टक्क्यांनी कमी झाल्याचे कृषी मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. यंदा मात्र मोसमी पाऊस चांगला राहणार असल्याने बासमतीच्या लागवड क्षेत्रात वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


बासमतीची लागवड यंदा चांगली  


गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सर्व प्रकारच्या भाताच्या लागवडीत 26 ते 27 टक्क्यांनी घट झाल्याचे कृषी मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. भातशेती अजूनही सुरू आहे. हरियाणा-पंजाबमध्ये शेतकऱ्यांकडून लागवड सुरू आहे. यंदा मान्सूनचा पाऊस चांगला होणार असल्याने बासमतीच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. बासमती तांदूळ निर्यातदाराने बासमती तांदूळ निर्यात करण्यासाठी गेल्या आठवड्यात इराणशी करार केला. बासमती तांदूळ येत्या पाच ते सहा दिवसांत जहाजाने इराणला पाठवला जाईल. त्यामुळे निर्यातदार देशांतर्गत बाजारातून मोठ्या प्रमाणात बासमती तांदूळ खरेदी करतील. परदेशातून मागणी वाढत असून बासमतीचे भाव वाढत आहेत. जुना साठा शिल्लक आहे. बासमतीचा नवा हंगाम सुरू होण्यास तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे बासमतीच्या दरात वाढ होणार आहे.