मधाचं पोळ दिसताच अस्वलानं मोर्चा वळवला, पण झालं असं की..! Video सोशल मीडियावर Viral
सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. जंगली प्राण्यांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. वन्यप्राण्यांचं राहणीमान, शिकार करण्याची पद्धत आणि सवयी नेटकऱ्यांना चांगल्याच भावतात. अस्वल आणि मध यांचा संबंध सर्वश्रूत आहे. अस्वलाला मध खूप आवडतं. यासाठी अस्वल कोणतीही जोखीम उचलण्यास तयार असतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Bears Scaling Steps For Beehives: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. जंगली प्राण्यांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. वन्यप्राण्यांचं राहणीमान, शिकार करण्याची पद्धत आणि सवयी नेटकऱ्यांना चांगल्याच भावतात. अस्वल आणि मध यांचा संबंध सर्वश्रूत आहे. अस्वलाला मध खूप आवडतं. यासाठी अस्वल कोणतीही जोखीम उचलण्यास तयार असतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जंगलालगत असलेल्या पाण्याच्या टाकीवर मधाचे पोळ लागल्याचं अस्वलांनी हेरलं. मग काय अस्वलांनी आपला मोर्चा मधाच्या पोळ्याकडे वळवला. त्यानंतर दोन अस्वल थेट पाण्याच्या टाकीवर चढले.
व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, एका अस्वलीने मधमाशांचा पोळ फोडत मध चाखण्यास सुरुवात केली. त्यामुळे बिथरलेल्या मधमाशा तिथून बाहेर पडल्या आणि त्यांनी दुसऱ्या अस्वलीवर हल्ला केला. त्यामुळे दुसरं अस्वल मधमाशांच्या पोळ्याकडे पोहोचलंच नाही. मधमाशांच्या आक्रमक पवित्रा पाहून दुसऱ्या अस्वलीने अर्ध्या मार्गातूनच माघार घेतली. हा संपूर्ण प्रकार एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला आहे.
हा व्हिडीओ नेमका कुठचा आहे याबाबत अजून काही स्पष्ट नाही. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. तसेच व्हिडीओखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.