Beaver Moon News:  यंदाच्या वर्षी 27 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेला बीवर चंद्राचा विशेष योगायोग होत आहे. आकाश रहस्यांनी भरलेलं आहे, असं मानलं जातं. त्यामुळे  चंद्राबद्दल नेहमीच उत्सुकता असते. नोव्हेंबर महिना आला की खगोलतज्ज्ञ बीवर मूनची (Beaver Moon) वाट पाहत असतात. त्यामुळे सोमवारची रात्र अनेकांसाठी चमत्कारीक असणार आहे. मात्र, बीवर मून म्हणजे असतं तरी काय? तो कधी पाहता येईल? जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नासाच्या प्लॅनेटरी जिऑलॉजी, जिओफिजिक्स आणि जिओकेमिस्ट्रीचे प्रमुख डॉ. नोआ पेट्रो यांनी याविषयी माहिती दिलीये. येणारा बीवर मून प्रत्येक पौर्णिमेप्रमाणेच दिसणार आहेत. मात्र, काही विशिष्ट वैशिष्ट्ये काही मिनिटाच्या एका चंद्रापासून दुसऱ्या मिनिटाच्या चंद्रामध्ये काही प्रमाणात भिन्न असतात, असं नोआ पेट्रो यांनी सांगितलं आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे किंवा दक्षिणेला राहणारे बीवर चंद्र पाहू शकतील, असंही त्यांनी म्हटलंय.


कसा पाहाल बीवर मून ?


चंद्र पाहण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छ आकाश असावं. हिवाळा आला असल्याने अनेक ठिकाणी धुकं दिसून येतं. त्यामुळे आकाश स्वच्छ नसतं. तुम्ही दुर्बिणने देखील बीवर मून पाहू शकता. मात्र, चंद्र पाहण्यासाठी कोणत्याही उपकरणाची गरज नाही. तुम्ही उघड्या डोळ्यांनी देखील चंद्र पाहू शकता. गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला बीवर चंद्र दिसला होता.



चंद्रग्रहण म्हणजे काय?


संपूर्ण चंद्रग्रहण तेव्हा होते जेव्हा पृथ्वी पूर्णपणे चंद्रावर आपली सावली टाकते. जेव्हा पूर्ण चंद्रग्रहण होते तेव्हा चंद्र पूर्णपणे लाल दिसतो. यामुळे याला ब्लड मून असेही म्हणतात. नासाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा सूर्याची किरणे पृथ्वीच्या वातावरणातून चंद्रापर्यंत पोहोचतात तेव्हा वातावरणात असलेल्या सूक्ष्म आणि धुळीच्या कणांमुळे चंद्र आपल्याला लाल दिसतो.