Chandrayaan : 23 ऑगस्ट 2023... तमाम भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण होता. याच दिवशी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 ने  चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले आणि भारताने नवा इतिहास रचला. संपूर्ण जगाचे लक्ष चांद्रयान-3 या मोहिमेकडे होते. भारताची चांद्रयान मोहिम यशस्वी झाली आणि ISRO ने अंतराळ क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. चांद्रयान-3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर आता Chandrayaan-3 आणि Chandrayaan-2 मोहिमेच्या पूर्व तयारीबाबतची अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. चंद्रावर लँड होण्याआधी भारताचे दोन्ही चांद्रयान पृथ्वीवरच लँड झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Chandrayaan-2 मोहिम अयशस्वी झाल्यानंतर ISRO Chandrayaan-3 मोहिम हाती घेतली. 14 जुलै 2023 रोजी भारताचे चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावले. श्रीहरिकोटामधल्या स्पेस सेंटरमधून दुपारी बरोब्बर 2 वाजून 35 मिनिटांनी  LVM 3 या लाँच व्हेईकलमधून चांद्रयानाचं प्रक्षेपण करण्यात आलं. यानंतर बरोबर 40 दिवसांनी म्हणजेच 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 ने  चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. 


इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी काही महिन्यांपूर्वी भारताच्या चांद्रयान मोहिमांची पूर्व तयारी कशा प्रकारे करण्यात आली याबाबत माहिती दिली. चंद्रावर लँड होण्याआधी भारताचे दोन्ही चांद्रयान पृथ्वीवरच लँड करण्यात आले होते. बेंगळुरूजवळ चंद्रावर असलेल्या जमीनीच्या खड्ड्यांप्रमाणे रचना करण्यात आली होती. येथेच  Chandrayaan-3 आणि Chandrayaan-2  कृत्रिम लँडिंग करण्यात आले होते. 


बेंगळुरूपासून 215 किलोमीटर अंतरावर असलेल्या चल्लाकेरेमध्ये कृत्रिम खड्डे तयार करण्यात आले आहेत. यांची रचना चंद्रावरील जमीनीवर असलेल्या खड्ड्यांप्रमाणे होते. येथे  Chandrayaan-3 आणि Chandrayaan-2  कृत्रिम लँडिंग करण्यात आले होते.  प्रत्यक्षात चंद्रावर लँडिंग करताना काय अडथळे येवू शकतात तसेच Chandrayaan-3 आणि Chandrayaan-2  असलेल्या सेंसरचे परिक्षण करण्यासाठी हे कृत्रिम लँडिंग करण्यात आले. येथे  Chandrayaan-3 आणि Chandrayaan-2  यांचे यशस्वी लँडिंग झाले होते. इतकचं नाही तर चांद्रयानचे लँडर आणि रोव्हरची चाचणी घेण्यात आली. चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी इस्रोने या कृत्रिम लँडिग साईटवर 1000 हून अधिक वेळा लँडिंगचा सराव केला होता अशी माहिती सोमनाथ यांनी एका प्रेजेंटेशन दरम्यान दिली. चांद्रयानच्या लँडिंगसाठी तयार करण्यात आलेली ही कृत्रिम साईट कशी होती. यान नेमकं कुठे लँड झाले याचे सॅलेलाईट फोटो ISRO ने शेअर केले आहेत. यासाठी  25 लाख रुपये खर्च आला.


चांद्रयान-3 मोहिम फत्ते


भारताची चांद्रयान-3 मोहिम फत्ते झाली आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत संशोधन केले. चंद्रावरील तापमान, हवामान, चंद्रावर होणारे भूकंप तसेच ऑक्सिजन, आर्यन तसेच इतर खनिजे या संदर्भातील भरपूर डेटा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने  गोळा केला आहे.