मुंबई : भारतीय शेअर बाजाराचे बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे आज वयाच्या 62 व्या वर्षी दीर्घ आजारपणाने निधन झालं. झुनझुनवाला यांच्या निधनानंतर आता त्यांचे अनेक फोटो, अनेक किस्से आणि अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. मात्र तुम्हाला माहितीय का राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या आधी हा व्यक्ती होता शेअर बाजाराचा बिग बूल. या व्यक्तीवर एक वेबसीरीज ही प्रदर्शित झाली होती. हा व्यक्ती कोण होता ते जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राकेश झुनझुनवालाने (Rakesh Jhunjhunwala) व्यापार सुरू केला तेव्हा ते बिअरच्या रूपात सट्टा लावत असे. हा तो काळ होता जेव्हा हर्षद मेहता बिग बुल या नावाने ओळखला जायचा. एका मुलाखतीत झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी स्वत: सांगितले की, त्यांनी शेअर्स विकून खूप पैसा कमावला. 1992 मध्ये जेव्हा हर्षद मेहता यांचे नाव घोटाळ्यात समोर आले होते, तेव्हा शेअर बाजार खूप कोसळला होता, त्या काळात राकेश झुनझुनवाला यांनी शेअर्सची शॉर्ट सेलिंग करून मोठा नफा कमावला होता.


कोण आहे हा बिग बूल? 
राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या आधी हर्षद मेहता (Harshad mehta) शेअर बाजारातला बिग बूल होता. याच व्यक्तीवर आधारीत Scam 1992 ही वेबसीरीज बनली होती. हर्षद शांतीलाल मेहता हे 1954 मध्ये राजकोट, गुजरात येथे जन्मले होते. मेहता हे स्टॉक मार्केट ब्रोकर होते. या व्यक्तीने गुजरातमध्ये साधी जीवनशैली जगून आपलं शिक्षण पुर्ण केलं. त्यानंतर ते मुंबईत आले.  मुंबईतील न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स लिमिटेड (NIACL) मध्ये स्थायिक होण्याआधी सेल्सपर्सन म्हणून त्यांनी अनेक सेल्स नोकऱ्यांमध्ये हात आजमावला.


1980 च्या दशकात नोकरी सोडल्यानंतर, ते एका ब्रोकरेज फर्ममध्ये रुजू झाले, जिथे त्यांची भेट प्रसन्न प्रणिवदास यांच्याशी झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो शिकला आणि शेअर बाजारात आपला ठसा उमटवला, त्याला "बिग बुल" आणि "भारतीय शेअर बाजाराचे अमिताभ बच्चन" ही पदवी मिळाली.


तुरुंगातच  मृत्यू
हर्षद मेहता (Harshad mehta) यांच्यावर घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर एकापाठोपाठ एक अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये 70 फौजदारी आणि सुमारे 600 दिवाणी खटल्यांचा समावेश होता. मात्र, केवळ एका प्रकरणाचे पुरावे सापडले. एवढ्या मोठ्या घोटाळ्यात दोषी असतानाही मेहता यांना 5 वर्षांची शिक्षा आणि 25 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. अखेर 2001 मध्ये हर्षदचा (Harshad mehta) तुरुंगातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. 


दरम्यान हे दोन्ही ही व्यक्ती शेअर बाजारातील बिग बुल होते. दोघांचाही काळ वेगळा होता. दोघांनीही आपआपल्या काळात शेअर बाजारातून असंख्य कोटी कमावले. म्हणून या दोघांना शेअर बाजारातील बिग बुल म्हटले जाते.