मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला असे काही व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपल्याला आश्चर्यचकित करतात. एवढंच काय तर बऱ्याचदा असे व्हिडीओ पाहून आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होऊन बसतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला हसू तर येईल, परंतु आपल्या आजूबाजूचे लोक आपली कशी फसवणूक करतात हे देखील तुमच्या लक्षात येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर आपल्या आजूबाजूला असे गरीब किंवा अपंग लोक पाहातो, आपल्याला बऱ्याचदा त्यांची दया येते, ज्यामुळे आपण त्यांना पैसे किंवा एखादी वस्तु मदत म्हणून देतो. परंतु तुम्हाला जर कळलं तर की, तुमची फसवणूक होत आहे?


व्हायरल होणारा व्हिडीओ असंच काहीसं दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ एका ट्रेनमधील आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती पण अपंग असल्याचे दाखवत लोकांकडून पैसे गोळा करत आहे. लोक देखील त्याला मदत म्हणून पैसे देत आहेत.


परंतु पुढच्याच क्षणी असं काहीतरी घडतं, जे पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हा आपल्या गुडग्यांवर चालणारा व्यक्ती अचानक आपल्या दोन पायांवर उभा राहातो ट्रेन खाली उतरुन चालू लागतो आणि तो ट्रेनच्या पुढच्या डब्याकडे जातो.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही तुमचे हसू आवरू शकणार नाही.


हा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत, तर सुमारे दोन लाख लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर इंटरनेटवर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.