भिकाऱ्यांच्या कमाईचे आकडे पाहून व्हाल थक्क! `कॉर्पोरेट जॉबपेक्षा भीक मागणं परवडलं` असेच म्हणाल
Beggars Survey News: भिकाऱ्यांच्या कमाईचा आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल, लखनऊमध्ये एक सरकारी सर्व्हे करण्यात आला होता. त्यात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.
Beggars Survey News: मोठ्या मोठ्या शहरातील चौकाचौकात आणि सिग्नलवर अनेकदा तुम्ही लहान मुलं, महिला तर कधी मुलांना कुशीत घेऊन महिलांना भीक मागताना पाहिलं असेल. त्यांच्याकडे पाहून अनेकांना दया येते आणि काही जण तर सढळ हाताने त्यांना मदत करतात. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्येही अशीच परिस्थिती आहेय. तेथील एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आश्चर्यचकित करणारे खुलासे समोर आले आहेत.
सर्व्हेनुसार, लखनऊमध्ये काही असे भिकारी आहेत जे दररोज 3 हजार रुपयांची कमाई करतात. ज्यांना तुम्ही असहाय्य आणि निराधार म्हणून भिक्षा देत आहात, ते कमाईच्या बाबतीत कोणत्याही अधिकाऱ्यापेक्षा कमी नाहीत. तेच लखनौचे लोक दररोज सुमारे ६३ लाख रुपयांची भीक देतात. राजधानीमध्ये मोठ्या संख्येने लोक भीक मागण्याचे काम करतात. लखनऊमध्ये जवळपास सर्व लहान मोठ्या चौकांवर मुलं, पुरुष आणि महिला भीक मागताना दिसतात. याच क्रमात समाज कल्याण विभाग, डूडा आणि नगर निगमच्या सर्व्हेमध्ये 5312 भिकारी सापडले आहेत.
या भिकाऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी भिकाऱ्यांकडून फॉर्म भरुन घेतले जात आहेत. या कामाच्या दरम्यानच हा खुलासा झाला आहे. इतकंच नव्हे तर, भीक मागणाऱ्या महिलांनी पुरुषांनाही मागे सोडलं आहे. कुशीत लहान मुलाला घेऊन भीक मागणाऱ्या आणि गर्भवती महिला रोज जवळपास तीन हजार रुपयांची कमाई करतात. तसंच मुलांनादेखील हजारोपर्यंतची भीक मिळते. तर, भिकाऱ्याची ही कमाई पाहून सर्वे करणारे लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. तसंच, सर्वेदरम्यान, काही भिकाऱ्यांकडे स्मार्टफोनदेखील सापडले आहेत.
चारबाग या भागातील भिकारी सर्वाधीक कमाई करतात. येथील एका भिकाऱ्याने स्पष्ट म्हटलं होती की, मला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ नको पण मला भीक मागण्याची परवानगी द्यावी.