'पुष्पा 2' नाही तर 2024 मध्ये 'या' चित्रपटांच्या रिलीज डेटमध्ये झालाय मोठा बदल

Bollywood-South Movies Release Date Changed: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. त्यासोबतच 2024 मध्ये बॉलिवूड आणि साउथ चित्रपटांच्या रिलीज डेटमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. 

| Oct 25, 2024, 13:34 PM IST
1/7

2024 मधील चित्रपट

2024 मध्ये अनेक चित्रपट रिलीज झाले आहेत. ज्यामध्ये आता शेवटच्या दोन महिन्यांमध्ये देखील अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 

2/7

पुष्पा 2

अशातच अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाची देखील रिलीज डेट बदलण्यात आली आहे. हा चित्रपट 6 डिसेंबर ऐवजी आता 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

3/7

सिंघम अगेन

अजय देवगनचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, आता हा चित्रपट दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

4/7

रेड 2

तसेच अजय देवगनचा 'रेड 2' हा चित्रपट 15 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार होता. मात्र, आता हा चित्रपट 21 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.   

5/7

देवा

शाहिद कपूरचा 'देवा' हा चित्रपट 11 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, निर्मात्यांनी आता या चित्रपटाच्या रिलीज डेट बदलून 14 फेब्रुवारी 2025 केली आहे. 

6/7

इमर्जन्सी

कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. त्यानंतर या चित्रपटाची रिलीज डेट अजूनही समोर आलेली नाही.

7/7

कंगुवा

सूर्याचा 'कंगुवा' हा चित्रपट 10 ऑक्टोंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, त्यानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट बदलून 14 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.