'सहकार्य करणार नाही त्याला...', शिवसेनेत गेल्यानंतर निलेश राणेंचा खळबळजनक दावा; म्हणाले, '20 नोव्हेंबरपर्यंत...'

Maharashtra Assembly Election Nilesh Rane: निलेश राणे यांनी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी एका खळबळजनक दावा केला आहे. नेमकं ते काय म्हणालेत जाणून घेऊयात सविस्तरपणे....

| Oct 25, 2024, 14:36 PM IST
1/11

eknathshinderanekudal

निलेश राणे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर दोन दिवसांनंतरच एक खळबळ दावा केला आहे. ते नक्की काय म्हणाले आणि प्रकरण काय जाणून घेऊयात...

2/11

eknathshinderanekudal

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे 23 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या महायुतीच्या महामेळाव्यात भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

3/11

eknathshinderanekudal

यावेळी मुख्यमंत्री शिदेंनीच त्यांच्या हाती धनुष्यबाण देत त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यांच्या येण्याने कोकणात शिवसेना अधिक भक्कम झाल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केलं.  

4/11

eknathshinderanekudal

मुख्यमंत्री शिदेंच्या पक्षाच प्रवेश केल्यानंतर निलेश राणेंना कुडाळमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

5/11

eknathshinderanekudal

निलेश राणे ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईकांविरुद्ध लढणार आहेत.  

6/11

eknathshinderanekudal

मात्र प्रत्यक्षात निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर आता निलेश राणेंनी विद्यमान आमदार असलेल्या वैभव नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वैभव नाईक स्थानिकांना धमकावत असल्याचं निलेश राणेंचं म्हणणं आहे. 

7/11

eknathshinderanekudal

"मी तमाम कुडाळ मालवण वासियांना हात जोडून विनंती करतो, मला खात्री आहे आमदार नाईकांनी आपल्याला फोन करून त्रास द्यायला सुरु केला आहे पण आपण फक्त 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत सहन करा, नंतर कधीच आपल्या कसलाही त्रास मी होऊ देणार नाही," असं निलेश राणेंनी आपल्या पोस्टच्या सुरुवातीला म्हटलं आहे. 

8/11

eknathshinderanekudal

"व्यवसायिकांना, अधिकाऱ्यांना आणि वेगवेगळ्या घटकांना फोन करून मला भेटून जा नाहीतर मी बघून घेईन हे सध्या उपक्रम नाईक यांचे सुरु आहे," असा आरोप निलेश राणेंनी केला आहे.  

9/11

eknathshinderanekudal

"कारखाने बंद करून टाकेन अशी धमकी दिली जात आहे, जो सहकार्य करणार नाही त्याला संपून टाकायच्या धमक्या दिल्या जात आहेत. म्हणून मी अगोदर म्हणालो फक्त 20 तारखेपर्यंत सहन करा," असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.

10/11

eknathshinderanekudal

ही पाहा निलेश राणेंची मूळ पोस्ट

11/11

eknathshinderanekudal

दरम्यान, शिंदेंच्या पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर आपल्या वडिलांचा पराभव झाला त्याच मतदारसंघातून आपल्याला विजय मिळवायचा आहे असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.