Bhikaro Buying iphone: सध्या सगळीकडे आयफोनचं वेड आहे. आपण सोशल मीडियातून व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतूनही पाहतो की आयफोन विकत घेण्यासाठी ग्राहकांची अक्षरक्ष: झुंबड लागलेली आहे. त्यातून लोकंही आयफोन 15 घेण्याासाठी मारामारी करताना दिसत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सध्या इन्टाग्रामवर तुम्हाला एख व्हिडीओ व्हायरल होताना दिसेल ज्यात एक भिकारी चक्क आयफोन घेण्यासाठी दुकानात पोहचला आहे. त्यानं आपल्या आयुष्यभराची कमाई आयफोन विकत घेण्यासाठी दिली आहे. त्याला भिकेतून मिळालेले पैसे त्यानं आयफोन विकत घेण्यासाठी खर्च केले आहेत. सध्या इन्स्टाग्रामवरती Experiment King नावाच्या एका हॅण्डलवरून एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यातून पाणी येईल. हे पाहून कदाचित तुम्हाला हेही जाणवेल की आपलं दु:ख हे याच्यापेक्षाही फार छोटं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु हा व्हिडीओ एक गमतीदार व्हिडीओ आहे.  यावरून सामाजिक धारणा, सहानुभूती आणि असे महागडे गॅजेट्स यांचा जेव्हा संबंध येतो तेव्हा माणूस म्हणून कोणत्या गोष्टी समोर येतात हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हालाही हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुम्हीही काहीतरी शिकाल. 


नक्की काय घडलं या व्हिडीओमध्ये? 


सध्या या इन्स्टाग्रामपेजच्या या अकांऊटवरून या कॉन्टेन्ट क्रिएटर्सनी एका माणसाला भिकारीसारखं बनवलं. हा जोधपूरचा व्हिडीओ आहे. तो तिथल्या एका शोरूममध्ये गेला. तेवढ्यात तो तिथला आयफोन पाहतो आणि तो विकत घेण्याची इर्षा व्यक्त करतो. काही लोकं त्याला पाहून असं दाखवतात की याला काय हा आयफोन विकत घेता येणार आहे? पण यालाच एक वेगळा ट्विस्ट येतो. जेव्हा दुकानाचा मालक त्याच्याकडे असणारी नाणी आयफोनच्या बदल्यात तयार होतो आणि तेवढ्यात त्याला आयफोन प्रोमॅक्स देऊन टाकतो. तेव्हा तो भिकारी त्या दुकानदाराला नाण्यांनी भरलेली बॅक देतो. सध्या हा व्हिडीओ 34 मिलियन लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पुर्ण स्क्रिप्टेड होता. परंतु प्रेक्षक हा व्हिडीओ एन्जॉय करतात. 


सध्या आयफोन 15 ची क्रेझ आहे. मागे एकदा सुद्धा असाच एक व्हिडीओ हा व्हायरल झाल होता. ज्यात एक माणून आयफोन घेण्यासाठी चक्क नाण्यांची बॅग घेऊन आला होता. परंतु त्या रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या त्या भिकाऱ्यालाही असं नक्कीच वाटत असेल की आपणही तो आयफोन घ्यावा. तेव्हा आशा ठेवा... उम्मीद पर तो दुनिया कायम आहे.