Viral Love Story : प्रेमात जात-पात, श्रीमंत-गरीब बघितलं जात नाही, प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून एक हृदयस्पर्शी अनोखी प्रेमकथा समोर आली आहे. एक भिकारी आपल्या पत्नीवरील प्रेमामुळे चांगलाच चर्चेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोघांच्या प्रेमाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. भीक मागून जगणाऱ्या संतोष नावाच्या भिकाऱ्याने आपल्या पत्नीला भेट म्हणून एक गाडी दिली आहे. पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी संतोषने एक मोपेड खरेदी केली आणि पत्नीला भेट दिली. विशेष म्हणजे आता दोघेही मोपेडवरुन भीक मागायला निघतात. मध्यप्रदेशमधल्या छिंदवाडामधली ही अनोखी लव्हस्टोरी आहे.


संतोष साहू आणि त्यांची पत्नी मुन्नी साहू हे छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा इथले रहिवासी आहेत. संतोष हा अपंग आहे. तो भीक मागण्यासाठी ट्रायसायकलवर फिरतो आणि त्याची पत्नी मुन्नीबाई त्याला मदत करते.


संतोष साहू ट्रायसायकलवर बसायचे आणि त्यांची पत्नी धक्का मारायची. अनेकवेळा खराब रस्त्यामुळे पत्नी मुन्नाबाईला ट्रायसिकल ढकलणे कठीण होत असे. बायकोचा हा त्रास संतोषला बघितला जात नव्हता.


अनेकवेळा त्यांची पत्नीही आजारी पडली. ज्यांच्या उपचारासाठी त्यांना खूप पैसे खर्च करावे लागले. एके दिवशी मुन्नीने संतोषला मोपेड घेण्याचा सल्ला दिला. संतोषने कोणत्याही परिस्थितीत पत्नीसाठी मोपेड खरेदी करणारच असा निर्धार केला.


दोघेही बसस्थानक, मंदिर आणि दर्ग्यावर जाऊन भीक मागायचे त्यांची दररोजची कमाई साधारण 300 ते 400 रुपये इतकी आहे. पै-पै जोडून दोघांनी चार वर्षात 90 हजार रुपये जमा केले आणि या शनिवारी रोख रक्कम देऊन त्यांनी अखेर मोपेज खरेदी केली. संतोषने आपल्या पत्नीचं स्वप्न पूर्ण केलं.



कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला. ज्याला खूप पसंती दिली जात आहे. आता पती-पत्नी मोपेडवर भीक मागण्यासाठी बाहेर पडतात. छिंदवाड्यातील रस्त्यांवर बार कोडमधून पैसे घेणाऱ्या एका भिकाऱ्याचीही चांगलीच चर्चा झाली होती. आता संतोष आणि मुन्नीचीही चांगलीच चर्चा आहे.