कर्नाटकच्या सरकारला शिवसेनेचा इशारा, संजय राऊत संतापलेत
कर्नाटकचा ( Karnataka) प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे
मुंबई : कर्नाटकचा ( Karnataka) प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे. हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळाले पाहिजे. त्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे. कायद्याने काय व्हायचं ते होईलचं, पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आहेत, हे सुद्धा कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये, अशा शब्दात शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फटकारले आहे. (Shiv Sena's warning to Karnataka government)
बेळगाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमा या विषयावर ज्या पद्धतीनं पावलं टाकायला पाहिजेत, ती टाकायचला सुरूवात झालेली आहे. कुणी तिकडं काही बरळलं तरी इकडं आम्हाला फरक पडत नाही, अशा शब्दांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदींनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा, या केलेल्या मागणीवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. काही नेते असे बरळत असतात, हा दोन राज्याच्या सीमेचा प्रश्न आहे, आम्ही कानडी शाळा देखील चालवतो असा टोलाही राऊत यांनी लगावला. इथे येऊन कानडी जनतेशी चर्चा करावी, ते देखील बेळगाव महाराष्ट्रात यावे, असेच म्हणतील असं संजय राऊत यांनी सौदी यांना सुनावले.