जमिनीवर बसून जेवण्याचे 5 मोठे फायदे
जमिनीवर बसून जेवण्याचे 5 मोठे फायदे
मुंबई : आज अनेकांना बेडवर किंवा खुर्चीवर बसून जेवण करतात. खाली बसून जेवण करण्यात आज अनेकांना लाज वाटते. पण जमिनीवर बसून जेवणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. त्यामुळे याआधी पूर्वज जमिनीवर बसून जेवत होते. जमिनीवर बसून जेवण्याचे काय आहेत फायदे आज आपण जाणून घेऊया.
1. वजन नियंत्रित ठेवतो
जमिनीवर बसणं आणि उठणं हा एक चांगला व्यायाम आहे. जेवणासाठी जमिनीवर बसावं लागतं त्यानंतर पुन्हा उठावं लागतं. अर्ध पद्मासनाचा हे आसन हळूहळू जेवणं आणि पचन प्रकियेत मदत करतो. यामुळे वजन नियंत्रित राहतं.
2. आरोग्यासाठी चांगलं
जमिनीवर बसून जेवल्याने फक्त भोजनच होत नाही तर हे एक योगासन आहे. जेव्हा भारतीय परंपरेनुसार आपण जमिनीवर भोजनासाठी बसतो तेव्हा त्यामुळे सुखासन हे पद्मासन होतं. या आसनामुळे आपलं आरोग्या चांगलं राहतं.
3. रक्तदाब
खाली बसून जेवल्याने पाठीच्या कण्याच्या खालच्या भागावर जोर पडतो ज्यामुळे तुम्हाला आराम मिळतो. तुम्हाला जोरात श्वास घेण्याची गरज नसते. मांसपेशींमध्ये ताण पडत नाही. यामुळे रक्तदाब ही नियंत्रित राहतो.
4. पचन प्रक्रिया
जमिनीवर बसून जेवल्याने तुम्हाला भोजन करण्यासाठी प्लेटकडे झुकावं लागत. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे तुमच्या पोटाच्या मासपेशी कार्यरत राहतात. यामुळे तुमची पचनक्रिया चांगली राहते.
5. गुडघ्यांचा व्यायाम
जमिनीवर बसून भोजन केल्याने संपूर्ण शरीर चांगलं राहतं. पचन क्रिया सुरळीत राहते. बसतांना तुमच्या गुडघ्यांचा व्यायाम होतो. यामुळे गुडघ्यांचा त्रास होत नाही.