पश्चिम बंगाल : विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Election) हॅटट्रिक केल्यानंतर  पश्चिम बंगालमधील टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) बुधवारी सकाळी 10.45 वाजता राजभवनात तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. कोविड -19 साथीच्या पार्श्वभूमीवर राजभवनात आयोजित या साध्या सोहळ्यामध्ये केवळ 50 लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. आमंत्रीत लोकांच्या यादिमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय प्रमुख सौरब गांगुली (Sourav Ganguly) यांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे राज्यातील विविध भागातील हिंसाचाराच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव, गृहसचिव, कोलकाता पोलिस आयुक्त आणि पोलिस महासंचालक यांच्या समवेत कालिघाट येथील निवासस्थानी बैठक घेतली. बैठकीत त्यांनी राज्यातील विविध भागात होत असलेल्या हिंसाचाराबाबत कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.


दिलीप घोष आणि इतर नेते या सोहळ्याला आमंत्रित


या समारंभास माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, माजी विधानसभा अध्यक्ष बिमान बॅनर्जी, प्रशांत किशोर, अभिषेक बॅनर्जी, सुब्रत मुखर्जी, टीएमसीचे महासचिव पार्थ चटर्जी, फिरहद हकीम, सुब्रत बक्शी, अभिनेता देव, भाजपाचे बंगाल युनिटचे अध्यक्ष दिलीप घोष, माकपा  प्रदेश सचिव विमान बोस, भाजपचे आमदार मनोज तिग्गा, कँग्रेस नेते प्रदीप भट्टाचार्य सहित इतरांना आमंत्रित करण्यात आले आहे.


राज्यपाल जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत सकाळी 10.45 वाजता ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. यासह टीएमसीचे ज्येष्ठ नेते सुब्रत मुखर्जी हे प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ घेतील. तसेच नवनिर्वाचित आमदारांना 6 आणि 7 मे रोजी शपथ देण्यात येईल.


शपथ घेतल्यानंतर नबान्नमध्ये बैठक


राजभवनात शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी थेट नबान्न राज्य सचिवालयात जातील. नबान्न आता सजले जात आहे. नबान्नन येथे सीएम ममता बॅनर्जी यांना पोलिस गार्ड ऑफ ऑनर देतील. आयपीएस धृतिमान सरकार, डीसी कॉम्बॅट यांच्या नेतृत्वात गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल. यानंतर मुख्यमंत्री राज्य अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतील.


कोविड -19 बाबत कठोर निर्णय घेऊ शकतात


सीएम ममता बॅनर्जी कोविड -19वर अधिकाऱ्यांसोबतच्या या बैठकीत कठोर निर्णय घेऊ शकतात. तिसर्‍यांदा सत्तेत आल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी हे स्पष्ट केले आहे की, कोरोनावर नियंत्रण ठेवणे हे त्यांचे पहिले प्राधान्य असेल. बंगालमध्ये सध्या काही ठिकाणी अंशीक लॉकडाऊन आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या उद्या कठोर निर्णय घेऊ शकतात.