बंगलुरू : बंगलुरू येथे पहाटे 2 वाजता झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांनी आपला जीव गमावला. या दोन्ही अपघातांची तीव्रता अधिक आहे. बंगलूरूमधील अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश. भरधाव वेगात असलेल्या कारने बाऊंड्री वॉलला जोरात धडक दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही धडक एवढी जबरदस्त होती की कारने तेथेच पलटी घेतली. यामध्ये भीषण अपघात झाला. अपघात एवढा भयानक होता की 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. एका व्यक्तीला तात्काळ रूग्णालयात दाखल कऱण्यात आलं. पण त्यांना तेथे त्याला मृत घोषित करण्यात आला. यामध्ये करूण सागर नावाच्या तरूणाचा समावेश आहे. जो तामिळनाडूमधील आमदार प्रकाश यांचा मुलगा असल्याचं म्हटलं जातंय.



हा अपघात रात्री 2 वाजता झाला. या प्रकरणाची चौकसी केली जाणार आहे. रस्ता रिकामा असताना भरधाव वेगात चालक गाडी चालवत होता का, असं म्हटलं जात आहे. 



ANI ने दिलेल्या माहितीनुसार, सात मृतकांमध्ये करूणा सागर आणि बिंदू हे तामिळनाडूमधील होसूर विधानसभेचे डीएमके आमदार वाय प्रकाश यांच्या मुलाचा आणि सुनेचा समावेश आहे. या माहितीला आमदारांनी दुजोरा दिला आहे. एका सीसीटीव्ही क्लिपमध्ये असं दिसतंय की, कोरमंगलामध्ये कार भरधाव वेगात एका पोलला धडकली. त्यावेळी कार हवेत होती.