बंगलुरु महालक्ष्मी हत्याकांडाला एक वेगळंच वळण मिळालं आहे. 29 वर्षीय महालक्ष्मीची हत्या नेमकी कुणी केली याचा तपास सुरु असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्याकांडाचा आरोपी समोर येण्याऐवजी त्याच्या आत्महत्येची बातमी समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी सगळ्यात आधी महालक्ष्मीच्या नवऱ्याची चौकशी केली. नवऱ्याने या प्रकरणात महालक्ष्मीच्या हत्याकांडात तिचा प्रियकर अशरफचा हात असल्याचं सांगतो. यानंतर पोलिसांनी आरोपीचा तपास करायला सुरुवात केली. पण या सगळ्यात आरोपीचा मृतदेह एका झाडावर लटकताना दिसला. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा महालक्ष्मीसोबत नातेसंबंधात होता. या आरोपीची ओळख 31 वर्षीय मुक्तिरंजन प्रताप रॉय असं आहे. मुक्तिरंजनचा मृतदेह हा भद्रक जिल्ह्यातील धुसुरीमधील एका झाडाला लटकताना दिसली. पोलिसांचा दावा आहे की, याच्यासोबत सुसाईड नोट मिळाली आहे. ज्यामध्ये मुक्तिरंजनने आपला अपराधा कबल केला आहे. 


(हे पण वाचा - बंगळुरू हत्या प्रकरणाला नवं वळण; महालक्ष्मीचे 59 तुकडे करणाऱ्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू) 


दोघंही कधीपासून एकत्र 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे एकत्र कपड्यांच्या दुकानात काम करत होते. येथेच दोघांची ओळख झाली आणि दोघांमध्ये मैत्री झाली. दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. महालक्ष्मी मुक्तिरंजनवर लग्नासाठी दबाव आणत होती. दोघांमध्ये या मुद्द्यावरुन अनेकदा वाद देखील झाले. या गोष्टीवरुन नाराज झालेल्या मुक्तिरंजनने महालक्ष्मीची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवले. 


लहान भावासमोर कबुल केला गुन्हा 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,'हत्येनंतर मुक्तिरंजनने आपल्या लहान भावाला फोन केला आणि तात्काळ भाडेतत्वाचं घर सोडून जाण्यास सांगितलं.' यावर त्याने चौकशी केल्यास फोनवर नको भेटल्यावर सांगेन असं म्हटलं. त्याने भावासमोर महालक्ष्मीच्या हत्येची कबुली दिली आणि आता आपण येथे राहू शकत नसल्याचं सांगितलं. 


ओडिशाच्या गावात मिळालं लोकेशन 


पोलिसांनी सांगितलं की, कॉल रेकॉर्डच्या मदतीने आरोपीला ओळखणं सोपं झालं होतं. त्याच्या मोबाइलचं लोकेशन सुरुवातीला पश्चिम बंगालमध्ये सापडलं. यानंतर फोन बंद करण्यात आला. यानंतर त्याचं लोकेशन ओडिशाच्या एका गावात सापडलं. यानंतर त्याला पकडण्यासाठी टीम पाठवण्यात आली. मुक्तिरंजनने ओडिशामध्ये खूप ठिकाणी जागा बदलली. 


20 दिवसांपूर्वी महालक्ष्मीची हत्या 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंगलुरुमधील महालक्ष्मीच्या राहत्या घरी तिच्याच फ्रिजमध्ये जवळपास 59 तुकडे करुन ठेवले होते. 20 दिवसांपूर्वी म्हणजे 2 किंवा 3 सप्टेंबर रोजी महालक्ष्मीची हत्या करण्यात आली.