नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मै भी चौकीदार' कॅम्पेनला सुरूवात केली आहे. यानंतर भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आपल्या नावापुढे 'चौकीदार' चे बिरूद लावले आहे. आता काँग्रेस नेता हार्दिक पटेल यांनी याला उत्तर देत स्वत:च्या नावापुढे 'बेरोजगार' लावले आहे. याद्वारे हार्दीक पटेल बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात आहेत. राफेल प्रकरणामध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. यामध्ये 'चौकीदार ही चोर है'चा नारा त्यांनी दिला. याला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान आमि भाजपाच्या नेत्यांनी 'मै भी चौकीदार' हे कॅम्पेन लॉंच केले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह, रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्यासहित जेपी नड्डा आणि अनेक नेत्यांनी ट्विटरवरील आपल्या नावापुढे चौकीदार शब्द लावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


हार्दिक पटेल यांनी आपल्या नावापुढे 'बेरोजगार' शब्द जोडून नवा ट्रेंड सुरू केला आहे. आता सोशल मीडियावर या कॅम्पेनचा प्रभाव कसा पडतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हार्दिक पटेल यांनी गुजरातमध्ये पाटीदार आंदोलन उभे करुन राज्यातील भाजपा सरकार विरोधात मोर्चा उघडला होता. यानंतर सलग त्यांनी बेरोजगारीच्या मु्द्द्यावर भाजपा नेते आणि पंतप्रधान मोदींवर सातत्याने निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपण देशाचे चौकीदार असल्याचे एका सभेत सांगितले होते. त्यांच्या या विधानाचा विरोधकांनी समाचार घेतला. राहुल गांधी, कन्हय्या कुमार यांनी आपल्या भाषणांमध्ये 'चौकीदारही चोर है' असे म्हटले. त्यानंतर 'चौकीदारही चोर है' हे सोशल मीडियात ट्रेण्ड व्हायला लागले. भाजपा सरकारने न पाळलेल्या आश्वासने समोर आणत विरोधकांनी  'चौकीदारही चोर है' हे वाक्य हॅशटॅग सहीत देशभरात पसरवले.



राफेल प्रकरणात तर याला आणखी जोर मिळाला. अंबांनींचा सहभाग, फाईल गहाळ याप्रकरणांनंतरही 'चौकीदारही चोर है' या वाक्यावर राहुल गांधी यांनी जोर दिला. पण हा प्रचार हाणून पाडण्यासाठी भाजपाच्या आयटी सेलने नवी शक्कल लढवलेली पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींनी स्वत:च्या नावापुढे चौकीदार शब्दप्रयोग केला. त्यानंतर भाजपाच्या जवळजवळ सर्वच नेत्यांनी आपल्या नावांच्या पुढे चौकीदार लावले आहे. त्यांना फॉलो करणाऱ्या कार्यकर्त्यांनीही आपल्या नावापुढे चौकीदार शब्द लावला आहे. पंतप्रधान मोदी 500 ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरंस घेऊन 'मै भी चौकीदार' कॅम्पेन चालवणार आहेत.