मुंबई : तुम्हाला कार घ्यायची असेल अन् तुमचे बजेट रु. 8 लाखांच्या आसपास असेल तर, कोणती कार घ्यायची याबाबत आम्ही काही पर्याय सूचवणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हॅचबॅक(Hatchback), सेडान (Sedan) की एसयूव्ही (SUV) घ्यायची हे आधी ठरवायला हवे. काही कारमध्ये काही खास गोष्टी असतील तर काहींमध्ये नसतील. कार घेण्याच्या निर्णयात मदत करण्यासाठी आम्ही तुम्हाला बजेटमधील पर्याय सूचवत आहोत.(Best car under 8 lakhs)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ह्युंदाई Venue



या बजेटमध्ये Hyundai ची कॉम्पॅक्ट SUV Venue हा एक चांगला पर्याय असू शकतो. कारची मुंबई एक्स-शोरूम किंमत 6,99,200 रुपये आहे. 


ह्युंदाई i20



ही Hyundai ची चांगले परीक्षण केलेली कार आहे. ही कार या बजेटमध्येही तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल. कारची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 6,91,200 रुपये आहे. 


महिंद्रा XUV300



महिंद्राची कॉम्पॅक्ट SUV Mahindra XUV300 देखील 8 लाख रुपयांच्या बजेटमध्ये एक उत्तम पर्याय असू शकते. पुण्यात कारची एक्स-शोरूम किंमत 7.96 लाख रुपये आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.


फोक्सवॅगन पोलो (Volkswagen Polo) 



या बजेटमध्ये फोक्सवॅगन पोलो ही चांगली हॅचबॅक आहे. कारची एक्स-शोरूम किंमत 6.32 लाख रुपये आहे. यात 1.0L MPI इंजिन आहे.


टाटा नेक्सॉन



Tata Nexon, Tata Motors ची अतिशय लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV, या बजेटमध्ये एक जबरदस्त पर्याय आहे. ही भारतातील पहिली सर्वात सुरक्षित 5 स्टार रेटिंग कार आहे. कारची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 7.29 लाख रुपये आहे.


होंडा न्यू जॅझ



तुम्ही Honda Cars मधून Honda Jazz ही कॉम्पॅक्ट SUV देखील खरेदी करू शकता. दिल्लीत कारची एक्स-शोरूम किंमत 7,65,106 रुपये आहे.


होंडा अमेझ



Honda Amaze ही Honda Cars ची सेडान देखील चांगली कार आहे. बाजारात कारची चांगली लोकप्रियता आहे. तुम्ही दिल्लीमध्ये 6.32 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत खरेदी करू शकता.


टोयोटा ग्लान्झा



या बजेटमध्ये टोयोटाचा हॅचबॅक ग्लॉस पर्यायही तुमच्यासाठी चांगला आहे. कारची एक्स-शोरूम किंमत 7.49 लाख रुपये आहे. तुम्ही प्रीमियम हॅचबॅकमध्ये देखील त्याची निवड करू शकता.


Best car under 8 lakhs in india 2021