नवी दिल्ली : पोल राइट्स ग्रुप असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) च्या एका रिपोर्टनुसार, 2016 ते 2020 दरम्यान १७० हून अधिक आमदारांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे. तर याच काळात भाजपच्या १८ आमदारांनी पक्ष साडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एडीआरने एका नव्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, 2016 ते 2020 दरम्यान 405 हे पुन्हा निवडणूक लढवणारे आमदार आहेत. ज्यापैकी 182 आमदार असे आहेत जे भाजपमध्ये आले आहेत. 38 आमदार काँग्रेसमध्ये आले आहेत. आणि 25 आमदार तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) मध्ये सहभागी झाले आहेत.


रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 5 लोकसभा खासदारांनी भाजप पक्ष सोडला. तर सात राज्यसभा खासदारांनी 2016 ते 2020 दरम्यान काँग्रेस सोडली.


2016-2020 दरम्यान 170 हून अधिक आमदारांनी पक्ष सोडला. ज्यामध्ये मध्य प्रदेश, मणिपूर, गोवा, अरुणाचल प्रदेश आणि कर्नाटक राज्यांचा समावेश आहे. जिथे पक्ष सोडल्यामुळे सरकार पडलं.


2016-2020 दरम्यान 16 राज्यसभा खासदारांपैकी 10 खासदार भाजपमध्ये गेले. 12 लोकसभा खासदारांपैकी पाच खासदार आपला पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले.


या अहवाल नॅशनल इलेक्शन वॉच आणि एडीआरने 433 खासदारांच्या आणि आमदारांच्या शपथपत्राचं विश्लेषण केलं आहे. ज्यांनी मागील 5 वर्षात पक्ष बदलला आहे.