राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे गोव्याचा अतिरिक्त कार्यभार, कोंकणी भाषेतून घेतली शपथ
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी दिली पदाची शपथ.
पणजी : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गोव्याच्या राज्यपालपदाची (अतिरिक्त कार्यभार) शपथ घेतली. पणजी येथील राजभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी त्यांना पदाची शपथ दिली. राज्यपालांनी यावेळी कोंकणी भाषेतून शपथ घेतली.
शपथविधी सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत व इतर मान्यवर उपस्थित होते. गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मेघालयच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर गोव्याच्या राज्यपालपदाची जागा रिक्त होती. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याचा देखील कार्यभार देण्यात आला आहे.