Brother Sister Cute Video: तुझं माझं जमत नाय अन् तुझ्याशिवाय करमत नाय, अशी गत बहीण भावाच्या (Brother Sister Relation) नात्यामध्ये असते. जगातील 'खट्टा मीठा' असं कोणतं नातं असेल तर ते भावा बहिणीचं नातं. सर्वात जास्त काळजी करणारी असते ती लाडकी बहीण. कोणत्याही संकटाच्या काळात पाठीशी उभी राहते आणि भावाची सगळी सिक्रेट माहिती असणारी देखील तीच असते. बहिण भावांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक व्हायरल (Viral Video) झालेले पाहिले असतील. असाच एक व्हिडिओ सध्या ट्रेंडिंगमध्ये (Trending Video) असल्याचं दिसतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या लहान मुलांची निरागसता पाहून कधीकधी आई वडिलांना देखील कौतूक वाटतं. ना कोणता छुपी भावना ना कोणता मनात राग...जे काही आहे ते थेट स्पष्ट बोलणारी मुलं कधी कधी मन जिंकून घेतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. लहान चिमुकली आपल्या लाडक्या भावाची कान पकडून माफी मागत असल्याचं दिसतंय. या व्हिडीओने इंटरनेटवर अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


आणखी वाचा - T20 Blast: ब्रॅड क्युरीने घेतला सुपरमॅन कॅच! डोळ्याचं पारणं फेडणारा Video पाहिलात का?


18 महिन्यांची आविरा आणि 11 वर्षांचा तिचा भाऊ विहान या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. लहान चिमुकली आपल्या भावाची कान पकडून माफी मागताना दिसत आहे. यात आविराचा गोंडसपणा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. त्याची आई सुमन चौधरी यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर ( avira_ki_dunia हँडलवरून) शेअर केला आहे. रुठे हुए जय भैया को मनानेकी प्यारी कोशिश, असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलंय. भांडण झाल्यावर चिमुकली स्वत: माफी मागताना दिसते. सॉली भैय्या म्हणताना ती दिसते. मात्र, भैय्या ऐकायला तयार नाही.


पाहा Video



दरम्यान, आविरा सतत तिच्या भावाची माफी मागत असते. मात्र तिचा भाऊ तिच्याशी बोलण्यास तयार होत नाही. त्यावेळी आविराचा पारा चढतो. ती मोठ्या मोठ्याने भावाला हाका मारते. तरी देखील भाऊ ऐकायला तयार नाही. त्यावेळी ती राग आवरते आणि भावाला बोलण्याचा प्रयत्न करते. काही वेळाने भावाचा राग शांत झाल्याचं दिसतंय. सध्या या निरागस बहिणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान शेअर होत असल्याचं दिसतंय.