नवी दिल्ली : एससी - एसटी कायद्याचा विरोध करणाऱ्या अनारक्षित वर्गानं आज 6 सप्टेंबर रोजी भारत बंद पुकारलाय. बंद दरम्यान हिंसात्मक घटना रोखण्यासाठी मध्यप्रदेशात दुपारी तीन वाजेपर्यंत कलम 144 (जमावबंदी) लागू करण्यात आलीय. सोबतच परवानगीविना आंदोलन, रॅली आणि समुहात एकत्र येण्याला बंदी घालण्यात आलीय. मध्यप्रदेशात सपाक्स, करणी सेना आणि ब्राह्मण संघटनांसोबत इतर सवर्ण संघटनांनी या भारत बंदचं समर्थन केलंय. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत जिल्ह्यातील पोलिसांना अलर्ट करण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बंदमुळे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान जन आशीर्वाद यात्रातल्या आपल्या सभा हेलिकॉप्टरनं पूर्ण करणार आहेत. नुकताच, शिवराज यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेक आणि एससी-एसटी कायद्याचा विरोध पाहता हा निर्णय घेण्यात आला. सवर्ण संघटनांचं देशव्यापी आंदोलन पाहता बिहारमध्ये हायअलर्ट घोषित करण्यात आलाय. मध्यप्रदेशच्या श्योपूर, छतरपूर, अशोकनगर, गुना, ग्वालियर, मुरैना, शिवपुरी, दतिया आणि भिंड या जिल्ह्यांना संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलंय. याशिवाय इंदोर, भोपाळ, ग्वालियर, दतिया या जिल्ह्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.


जबलपूर जिल्हाधिकारी छावी भारद्वाज यांनी राज्याच्या गृहविभागाला चिठ्ठी लिहून बंद दरम्यान इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची मागणी केलीय. मध्यप्रदेशातील पेट्रोल पंप संचालक असोसिएशननं पेट्रोल पंप ठेवण्याचा निर्णय घेतलाय.