नवी दिल्ली: आशिया खंडात नोबेल पुरस्कार म्हणून समजला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा रेमन मॅगसेसे पुरस्कार भारतातल्या सोनम वांगचूक आणि भारत वटवानी दोन जणांना जाहीर झालाय.  भारत वटवानी यांनी समाजाकडून अवहेलना झालेल्या आणि  वाऱ्यावर सोडलेल्या रस्त्यावरील मुलांच्या पुनर्वसनासाठी मोठं योगदान दिल्यानं त्यांचा गौरव करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हिमालयातल्या दुर्गम भागात निसर्ग, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल सोनम वांगचूक यांचा मॅनसेसे पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. आमिर खानच्या गाजलेल्या ‘थ्री इडियटस’ चित्रपटातील फुंगसुक वांगडु हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारीत आहे. लडाखसारख्या दूर्गम भागात वांगचुक यांनी शिक्षण, विज्ञानासारख्या क्षेत्रात अमुलाग्र बदल केले आहेत.


सोनम वांगचुक यांनी लडाखच्या दुर्गम भागात शिक्षण पद्धतीत कल्पक बदल केले, पाणी टंचाईवर मात करणारे ice stupa बनवले, लाखो लोकांना /मुलांना प्रयोग करण्याची, innovation ची प्रेरणा त्यांनी दिली.


वांगचुक यांनी १९८८ साली इंजिनिअरींगमध्ये पदवी घेतल्यानंतर लडाख सारख्या दुर्गम प्रदेशात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरु केला. त्यावेळी लडाखमधले ९५ टक्के विद्यार्थी सरकारी परिक्षांमध्ये नापास व्हायचे.


१९९४ साली वांगचुक यांनी शैक्षणिक सुधारणांसाठी ऑपरेशन न्यू होप हा कार्यक्रम सुरु केला. या कार्यक्रमातंर्गत त्यांनी आतापर्यंत ७०० शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे. त्याचा परिणाम असा झाला कि, १९९६ साली लडाखमध्ये दहावीच्या परिक्षेत विद्यार्थ्यांचे पास होण्याचे प्रमाण फक्त ५ टक्के होते. तेच प्रमाण २०१५ साली ७५ टक्क्यांवर पोहोचले.