Bhaubeej 2022: बहिणीला खूश करण्यासाठी द्या असं गिफ्ट, तुमच्या पैशांची होईल बचत
Diwali Bhaubeej 2022 Budget Gift: दिवाळी सणांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. धनतेरस, लक्ष्मीपूजनानंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते भाऊबीज सणाचं. भाऊबीज हा सण बहीण भावाचं नातं दृढ करणारा आहे. रक्षाबंधानानंतर भाऊबीज या सणांचं महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाची ओवाळणी करते आणि दीर्घ आयुष्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करते.
Diwali Bhaubeej 2022 Budget Gift: दिवाळी सणांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. धनतेरस, लक्ष्मीपूजनानंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते भाऊबीज सणाचं. भाऊबीज हा सण बहीण भावाचं नातं दृढ करणारा आहे. रक्षाबंधानानंतर भाऊबीज या सणांचं महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाची ओवाळणी करते आणि दीर्घ आयुष्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करते. या दिवसाचं औचित्य साधत भाऊ बहिणीला गिफ्ट देतो. पण अनेकदा भावानं दिलेलं गिफ्ट बहीणीच्या पसंतीस उतरत नाही. पण काही बहिणी मिळेल ते आपलं समजून आनंद व्यक्त करतात. जर तुम्हालाही तुमच्या बहिणीला खास गिफ्ट द्यायचं असेल तर काही वस्तूंची निवड करू शकता. या वस्तू तुमच्या बजेटमध्ये असून बहीण देखील खूश होईल.
स्मार्टफोन- Realme Narzo 50 (10,499 रुपये), Realme C33 (9,999 रुपये ), Samsung Galaxy F13 (9,499 रुपये), Oppo A15s (9,990 रुपये), Redmi 9A Sports (6,299 रुपये) या स्मार्टफोनची किंमत 10 हजार आणि त्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे तुम्हाला परवडेल असा स्मार्टफोन तुम्ही गिफ्ट देऊ शकता.
स्मार्टवॉच- स्मार्टफोन व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या बहिणीला स्मार्टवॉचही गिफ्ट करू शकता. स्मार्टवॉचमुळे आरोग्याची काळजी घेता येईल. बाजारात वेगवेगळ्या कंपन्याचे स्मार्टवॉच उपलब्ध आहेत. तसेच बजेटमध्ये असल्याने पैशांची बचत देखील होईल.
ज्वेलरी- तुम्ही तुमच्या बजेटनुसार सोन्या-चांदीची ज्वेलरी देखील गिफ्ट करू शकता. सध्या मार्केटमध्ये ऑक्साईड ज्वेलरी उपलब्ध असून ट्रेंड देखील आहे. आर्टिफिशिअल ज्वेलरी गिफ्ट देणं खिशाला परवडणारं देखील आहे.
Diwali Gift: दिवाळीला मिळालेल्या भेटवस्तूंवर Tax लागतो? समजून घ्या संपूर्ण गणित
कॉस्मेटिक- कॉस्मेटिक वस्तू मुलींचा जीव की प्राण असतो. कारण मुलींना सजणं आवडतं. जर तुम्ही तुमच्या बहिणीला कॉस्मेटिक वस्तू गिफ्ट दिली तर खूश होईल.
हँडबॅग- जर तुमची बहीण कॉलेज, ऑफिसला जात असेल तर पर्याय चांगला ठरू शकतो. तिला आवडत्या रंगाची बॅग गिफ्ट दिली तर बहीण नक्कीच खूश होईल. खरं बॅग गिफ्ट देणं खिशाला परवडणारं देखील आहे.