भीमा कोरोगाव प्रकरणाचे धागेदोरे आता आयएसआयपर्यंत
भीमा कोरोगाव प्रकरणाचे धागेदोरे आता आयएसआय पर्यंत
रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : भीमा कोरोगाव प्रकरणाचे धागेदोरे आता आयएसआय पर्यंत पोहोचले आहेत. गौतम नवलखा यांनी पाकिस्तानच्या आयएसआयच्या जनरल सोबत भेट घेतल्याचं एनआयएनं आपल्या चार्जशीट मध्ये नमूद केलंय. तसेच फुटीरवादी गुलाम नबी फई यांच्या संपर्कात नवलखा होते. त्याशिवाय मुस्लिम आणि दलितांची फोर्स तयार करून गुरिल्ला युद्ध करण्याची तयारी केली असल्याचंही चार्जशीट मध्ये लिहलंय.
गुलाम नबी फाई यांनी आयोजित केलेल्या 'काश्मिरी अमेरिकन कौन्सिल' (केएसी) परिषदेला संबोधित करण्यासाठी आरोपी गौतम नवलखा तीनदा यूएसए दौर्यावर गेले होते असे तपासादरम्यान समोर आले.
गुलाम नबी यांनं गौतम नवलखा यांनी पाकिस्तानी आयएसआय जनरलशी चर्चा केली. देशात दलित आणि मुस्लिमांची वेगळी फोर्स तयार करण्याचं काम केलं असं चार्जशीटमध्ये म्हटलंय. गौतम नवलखा फुटीरवादी गुलाम नबी फई याच्या संपर्कात होते आणि मोदी सरकार विरोधात गोरिल्ला युद्धाचा कट आखण्यात आल्याचे त्यात म्हटलंय. तसेच दिल्ली, मुंबई आणि छत्तीसगड येथे सीपीआय (माओ) साठी भरती योजना केली. फादर स्टेन स्वामी यांना नक्षलवादी कारवायांसाठी ८ लाख रूपये मिळाले असा दावा एनआयएनं चार्जशीटमध्ये केलाय.
चार्जशीटमधील महत्वाचे मुद्दे
- गौतम नौलख गुलाम नबी फि यांच्या संपर्कात होते
- ईमेल पत्त्याद्वारे आणि कधीकधी फोनद्वारे.
- आयएसआय आणि पाकिस्तान सरकारकडून निधी स्वीकारल्याबद्दल गुलाम नबी फाई यांना एफबीआयने जुलै २०११ मध्ये अटक केली होती, परंतु अमेरिकेच्या कायद्यानुसार आवश्यक त्या निधीचे मूळ सांगण्यात अपयशी ठरले.
- गौतम नौलाखा यांनी अमेरिकन कोर्टाच्या न्यायाधीशांना पत्र लिहून गुलाम फाईच्या खटल्याची सुनावणीसाठी प्रयत्न केला होता.
- गौतम नौलखा यांनी फेईच्या वतीने यूएस कोर्टाला पत्रेही दिली होती.
- गुलाम नबी फाई यांनी गौतम नवलखा यांची पाकिस्तानी आयएसआय जनरलशी ओळख करून दिली होती
- आयएसआयच्या निर्देशानुसार
- गौतम यांनी काश्मीर फुटीरवादी चळवळ आणि माओवादी चळवळीशी संबंधित अनेक विषयांवर वेगवेगळ्या मंचांवर आणि कार्यक्रमांमध्ये भाषणे केली आणि त्याचे समर्थन केले.