नाराज झालेल्या पटेल यांचा राजीनामा, पक्षाला मोठा झटका
या पोटनिवडणुकीमुळे राजकारण ढवळून निघालंय.
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा (Andheri By Election 2022) पोटनिवडणुकीची महाराष्टात सध्या चर्चा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीच्या उमेदवार (Mahaviskas Aghadi) आणि आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसऱ्याबाजूला पक्षाने सांगितलं तर मी माघार घेईन, अशी भूमिका भाजपच्या मुरजी पटेल (Murji Patel) यांनी घेतली आहे. या पोटनिवडणुकीमुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. त्यात आता शेजारील राज्यात गुजरातमध्ये (Gujrat) मोठा राजकीय भूकंप घडलाय. (big blow to congress before assembly elections in mehsana more than 50 leaders resigned)
गुजरातमध्ये काँग्रेसला विधानसभा निवडणुकीपर्वी तगडा झटका बसलाय. मेहसाणाच्या उंझा विधानसभा निवडणुकीपूर्वी उंझा तालुक्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. एक नाही, दोन नाही तर तब्बल 50 पेक्षा जास्त नेत्यांनी पदाचा राजीनामा दिलाय.
उंझा नगर प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष दशरथ पटेल आणि उंझा तालुका पंचायतीचे माजी अध्यक्ष जयप्रकाश पटेल यांनी राजीनामा दिला आहे. तसेच माजी तालुका पंचायत अध्यक्षा शांता पटेल, माजी जिल्हा पंचायत प्रतिनिधी महेश चौधरी यांनीही काँग्रेसचा 'हात' सोडला आहे.