BIG BREAKING : चीनचा कावेबाजपणा; अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय सैन्यानं हाणून पाडला मोठा कट
संघर्ष काही केल्या थांबेना...
नवी दिल्ली : चीनकडून सुरु असणारा कावेबाजपणा काही केल्या थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. त्यातच भारतीय सैन्याकडूनही आता चीनच्या या कावेबाजपणाला सडेतोड उत्तर देण्यात येत आहे. उत्तराखंडमधील बाराहोतीनंतर आता हाती आलेल्या माहितीनुसार अरुणाचल प्रदेशमध्ये जवळपास 200 चिनी सैनिक भारतीय भूमीत घुसखोरी करुन आले.
रिकाम्या बंकरना नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून करण्यात आला.ज्यानंतर तबांगमध्ये भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना ताब्यात घेतल्याचं म्हटलं जात आहे. अद्यापही सैन्याकडून याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार मागील आठवड्यामध्ये अरुणाचल प्रदेशातील सेक्टरमध्ये एलएसीवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. चीनच्या सैनिकांनी नियंत्रण रेषा ओलांडल्यामुळं हा संघर्ष ओढावला होता. काही तासांसाठी हा संघर्ष सुरु होता असंही म्हटलं जात आहे. दरम्यान, यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं स्पष्ट होत आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)