CDS जनरल बिपीन रावत यांना 21 नव्हे 17 तोफांची सलामी, असं का?
संपूर्ण लष्करी इतमामात निरोप
नवी दिल्ली : तामिळनाडूतील कुन्नूर येथे भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत आणि इतर 13 जणांना घेऊन जाणाऱ्या एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हा अपघात इतक्या भीषण स्वरुपाचा होता, की 14 पैकी 13 जणांचा यात दुर्दैवी मृत्यू ओढावला.
जनरल रावत यांना आणि त्यांच्या पत्नीला शुक्रवारी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांना संपूर्ण लष्करी इतमामात निरोप देण्यात आला असून, जवळपास 800 सैन्यदल अधिकारी उपस्थित असल्याचं असल्याचं सांगण्यात आलं.
17 तोफांची सलामी देत जनरल रावत यांना अखेरचा कडक सॅल्युट यावेळी दिला गेला.
सहसा भारतामध्ये 21 आणि 19 तोफांची सलामी देण्यात येते. पण, जनरल रावत यांना मात्र 17 तोफांची सलामनी देण्यात आली.
असं नेमकं का आणि केव्हा सुरु झाली ही परंपरा?
भारतात तोफांच्या सलामीची परंपरा ही ब्रिटीश राजवटीपासून सुरु झाली. त्या काळात ब्रिटीश सम्राटाला 100 तोफांची सलामी दिली जात असे.
अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान आणि कॅनडासह जगातील इतर राष्ट्रांमध्ये महत्त्वाच्या राष्ट्रीय दिवसांना 21 तोफांची सलामी देण्याची परंपरा आहे.
17 तोफांची सलामी सैन्यातील वरिष्ठ अधिकारी, नौदल कारवाई प्रमुख, लष्कर आणि वायुदल प्रमुख आंना दिली जाते. चीफ ऑफ डिफेन्स (CDS) अर्थात देशाच्या तिनही संरक्षण दलांना मिळून असणाऱ्या एका प्रमुख अधिकाऱ्यालाही 17 तोफांची सलामी दिली जाते.
काही प्रसंगांना भारताचे राष्ट्रपती, सैन्य आणि इतर काही ज्येष्ठ नेत्यांना अंत्यविधीदरम्यान 21 तोफांचीही सलामी दिली जाते.
असं म्हटलं जातं, की ही परंपरा 14 व्या शतकापासून सुरु झाली. त्यावेळी कोणत्याही देशाचं सैन्य जेव्हा सागरी मार्गानं दुसऱ्या देशात जात असे तेव्हा किनाऱ्यावर 7 तोफा डागल्या जात असत.
देशावर कोणत्याही प्रकारचा हल्ला करण्यासाठी आलो नसल्याचा हा संदेश होता.
दुसरी एक अशीही प्रथा होती की, पराभूत झालेल्या सैन्याला त्यांचा दारुगोळा संपवण्यास सांगितलं जात असे. जेणेकरुन ते त्याचा पुन्हा वापर रु शकणार नाहीत.
त्या काळात जहाजांवरही 7 तोफा असत. हा आकडा शुभ अल्याची धारणा असल्यामुळंच हे चित्र होतं.