श्रीनगर : काश्मिर खोऱ्यात भारतीय सुरक्षादलासमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. खोऱ्यात पार्ट टाईम दहशतवाद्यांचा प्रश्न देशासाठी मोठा धोकादायक असल्याचं सुरक्षादलाने म्हटलं आहे. पार्ट टाईम दहशतवादी म्हणजे जे सुरक्षा यंत्रणांच्या यादीत नाहीत. पण ते दहशतवादी हल्ले करतात आणि हल्ले झाले की आपल्या कामावर रुजू होतात, अशा लोकांना शोधणं हे सुरक्षा दलासाठी मोठं आव्हान आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मिर खोऱ्यात गेल्या दोन आठवड्यात 7 नागरिक मारले गेले. यानंतर सुरक्षा दल अशा पार्ट टाईम दहशतवाद्यांच्या शोधात आहेत जे गुप्तपणे हल्ले करत आहेत. काश्मिरचे पोलीस आयजी विजय कुमार यांनी सांगितलं की अशा लोकांची कुठेही नोंद नसते. पण ते दहशतवाद्यांच्या संपर्कात असतात. एक किंवा दोन दहशतवादी हल्ले केल्यानंतर हे लोक पुन्हा सामान्य जीवन जगू लागतात. 


यावर्षी आतापर्तंत तब्बल 97 पिस्तुल जप्त करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानचा हा नवा अंजडा असल्याचं विजय कुमार यांनी म्हटलं आहे. काश्मिर खोऱ्यात सर्वात जास्त हत्या या पिस्तुलने केल्या गेल्या आहेत. आणि यातील बहुतेक हल्ले हे पार्ट टाईम दहशतवाद्यांनी केलेले आहेत. सामान्य नागरिकांच्या हत्येच्या घटना वाढल्यानंतर पोलिसांनी गेल्या काही दिवसात पाचेशहून अधिक लोकांची चौकशी केली असून काही जणांना ताब्यात घेतलं आहे. 


निर्दोष आणि निशस्त्र लोकांना पिस्तूलने गोळी घालून मारलं जात आहे. यात काही पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. हत्या झाली त्यावेळी हे पोलीस कर्मचारी निशस्त्र होते. पिस्तुल लपवणं या दहशतवाद्यांसाठी सोप असतं. असं असलं तरी सुरक्षा यंत्रणा या सर्व प्रकरणाच पाठपुरावा करत आहेत.