शेअर बाजारात भूकंप! सेंसेक्सची तब्बल 2000 अंकानी आपटी, हजारो कोटींचे नुकसान
Stock Market Crash Live आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दुपारी 2.15 वाजेपर्यंत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेंसेक्स तब्बल 1900 हून अधिक अंकांनी घसरले आहे.
मुंबई : Market LIVE Updates: जगभरातील शेअर बाजारांमधील नकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर FII ने गेल्या आठवड्यांपासून विक्रीचा सपाटा केला होता. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दुपारी 2.15 वाजेपर्यंत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेंसेक्स तब्बल 1900 हून अधिक अंकांनी घसरले आहे. म्हणजेच एकाच सत्रात बाजार तब्बल 3 टक्क्यांहून अधिक घसरून 57,229 अंकांवर व्यवहार करीत होते. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक निफ्टी 500 अंकांनी घसरून 17000 अंकांवर व्यवहार करीत होते. यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे.
जगभरातील शेअर बाजारांमध्ये अस्थिरतेचे वातावरण, परकीय वित्त संस्थांकडून सुरू असलेला विक्रीचा सपाटा, वाढलेल्या तेलाच्या किमती, त्यामुळे गेल्या चार आठवड्यांपासून तेजीत असलेल्या भारतीय शेअर बाजारांना ब्रेक लागला. अन् गेल्या आठवड्यात बाजारात सलग घसरण नोंदवण्यात आली. आजही बाजारात विक्रमी घसरण नोंदवण्यात आली.
गेल्या आठवड्यात भारतीय बाजारातून FIIने गुंतवणूक काढून घेतल्याने निर्देशांकात घसरण दिसून आली. त्याचवेळी DII ने काहीशी खरेदीही केली. एकूणच अस्थिर वातावरणामुळे गुंतवणूकदारांनी विक्री सुरू ठेवल्याने बाजारात घसरण नोंदवण्यात आली.
येत्या आठवड्यात अनेक कंपन्यांचे येणारे तिमाही निकाल, परकीय संस्थांकडून केली जाणारी खरेदी विक्रीमुळे बाजाराची दिशा ठरणार आहे. त्यामुळे बाजाराच्या अस्तिरतेमुळे गुंतवणूकदार सावध पवित्र्यात आहेत.