खुशखबर! आता लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून जनरल तिकीटाने प्रवास करता येणार
कामाची बातमी | लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी मोठा निर्णय, जनरल तिकीटाने करता येणार प्रवास
मुंबई : सर्वाधिक प्रवास हा खासगी बसपेक्षा रेल्वेचा केव्हाही सोयीचा वाटतो. मात्र कोरोनामुळे रेल्वेनं प्रवास करणं काहीसं कठीण झालं होतं. लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी कोरोनामध्ये नियम कठोर केले होते. मात्र आता प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नागरिकांनी कृपया लक्ष द्या रेल्वेनं एक मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोना नियंत्रणात आल्यानंतर हळूहळू स्थिती पूर्ववत करण्यात येत आहे. त्यामुळे आता पुन्हा सर्वांसाठी ट्रेन सुरू होत आहे. ही सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी म्हणायला हवी. आता जनरल तिकीटावरही प्रवासी लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करू शकणार आहेत.
ही सुविधा या चार महिने बुक झालेल्या तिकीटांसाठी लागू होणार नाही. मात्र नव्याने बुकिंग करण्यात येणाऱ्यांसाठी लागू करण्यात येणार आहे. अॅडव्हान्स रिझर्व्हेशन कालावधी संपल्यानंतर लागू होणार होणार आहे.
होळीसाठी सर्वसामान्य जनरल तिकीटावर प्रवास करू शकणार आहेत. होळीसाठी गावी जाणाऱ्या लोकांना हा खूप मोठा दिलासा देणारी बातमी आहे.