एसबीआयचे ग्राहकांसाठी मोठे गिफ्ट...
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी नवे अॅप YONO (यू ओन्ली नीड वन) लाँच केलेय.
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी नवे अॅप YONO (यू ओन्ली नीड वन) लाँच केलेय.
या अॅपद्वारे तुम्ही गरजेच्या ६० सर्व्हिसचा लाभ एकाचठिकाणी मिळवू शकता. याचा अर्थ आता तुम्ही एसबीआयच्या नव्या अॅपवरुन उबेर, ओलाचे बुकिंग करु शकता. यासोबतच जॅबॉंग, मॅक्स फॅशन, मिंत्रावरुन शॉपिंगही करु शकता.
१४ विविध कॅटेगरीची सर्व्हिस
१४ विविध कॅटॅगरीमध्ये तुम्हाला पुस्तके, कॅब बुक करणे, मनोरंजन, खाणे-पिणे, ट्रॅव्हल आणि मेडिकलसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी बँकेने ६० हजार ई-कॉमर्स कंपन्यांसोबत करार केलाय. यात अॅमेझॉन, उबेर, मिंत्रा, शॉपर्स स्टॉप, थॉमस कुक, यात्रा यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. आयओएस आणि अँड्रॉईड यूजर्स हे नवे अॅप डाऊनलोड करु शकतात.
अॅपवर मिळणार ६० सर्व्हिस
एसबीआयच्या या नव्या अॅपवर फॅशन, कॅब अँड कार रेंटल, ऑटोमोबाइल, डील्स, इलेक्ट्रॉनिक्स, फूडस अँड एन्टरटेन्मेंट, गिफ्टिंग, ग्रोसरी, जनरल स्टोर्स, हेल्थ अँड पर्सनल केअर, होम अँड फर्निशिंग, हॉस्पिटॅलिटी अँड हॉलीडेज, ज्वेलरी आणि अशा अनेक सुविधा आहेत.
एसबीआयच्या चेअरमनचे विधान
एसबीआयच्या चेअरमननी दिलेल्या माहितीनुसार, डिजीटल इंडिया मोहिमेच्या दिशेने एसबीआयचे हे नवे पाऊल आहे. एसबीआयच्या नव्या योनो अॅपद्वारे एकाच प्लॅटफॉर्मवर एकाच युजर आयडीद्वारे गरजेच्या सर्व सुविधांचा लाभ उठवू शकतात.