LPG Gas Cylinder Rules : सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी आहे. तुम्ही गॅस सिलिंडर (Gas Cylinder) वापरत असाल तर एका वर्षात किती सिलिंडर घेऊ शकता जाणून घ्या. याबाबतचे नवे नियम जारी करण्यात आले आहेत. एका वर्षात किती सिलिंडर घेऊ शकता हे आपण जाणून घेणार आहोत. (big news any customer can book only 15 cylinders in 1 year)


सिलेंडरची संख्या ठरली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्राहकांसाठी घरगुती वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडरची संख्या निश्चित करण्यात आली आहे. आतापासून कोणताही ग्राहक 1 वर्षात केवळ 15 सिलिंडर बुक करू शकतो. म्हणजेच आता एका वर्षात 15 पेक्षा जास्त सिलिंडर घेऊ शकणार नाही.  तसेच 1 महिन्यात 2 पेक्षा जास्त सिलिंडर घेता येणार नाही.


हे सिलिंडर घेण्यासाठी नवीन नियम करण्यात आले आहेत. आतापर्यंत सिलिंडर मिळवण्यासाठी काही महिन्यांचा किंवा वर्षांचा कोटा निश्चित करण्यात आला नव्हता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1 वर्षात अनुदानित सिलिंडरची संख्या 12 झाली आहे. जर तुम्ही 15 सिलिंडर घेतले तर तुम्हाला फक्त 12 वर सबसिडी मिळेल.


ऑक्टोबरमधील दर 


आयोसीनुसार (IOC) 1 ऑक्टोबरपासून गॅसच्या नवीन किमती जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर दिल्लीत सिलेंडरची किंमत 1 हजार 53 रुपये, मुंबईत 1 हजार 52.5 रुपये, चेन्नईमध्ये 1 हजार 68.5 रुपये आणि कोलकातामध्ये 1 हजार 79 रुपये आहे.