मुंबई : 7th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कर्मचाऱ्यांना लवकरच जुन्या पेन्शन योजनेचा (OPS) लाभ मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून ही मागणी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे केली होती. केंद्र सरकार आता कर्मचाऱ्यांच्या मागणीवर विचार केला आहे. त्यानुसार केंद्राने यासाठी जुनी पेन्शन योजनेवर  (Old Pension Scheme-OPS)कायदा मंत्रालयाचे मतही मागवले आहे. आता मंत्रालयाच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.


जाणून घ्या निर्णय कधी होणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तविक, केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेवर Old Pension Scheme, OPS) विचार करत आहे. 31 डिसेंबर 2003 रोजी किंवा त्यापूर्वी ज्या सरकारी नोकरभरतीच्या जाहिराती दिल्या होत्या, त्यांना हा लाभ मिळेल. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, कायदा मंत्रालयाच्या प्रतिसादानंतर या विषयावर निर्णय घेतला जाईल.


कोणत्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार 


केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी संसदेत सांगितले की, 'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने हे प्रकरण कायदा मंत्रालयाच्या अखत्यारीत ठेवले होते. वित्तीय सेवा विभाग, निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग (DoP&PW) अशा कर्मचाऱ्यांना NPS च्या कक्षेतून वगळण्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकेल ज्यांच्या भरतीसाठी 1 जानेवारी 2004 रोजी किंवा त्यापूर्वी जाहिरात जारी करण्यात आली होती आणि ते यासाठी पात्र असतील. जुनी पेन्शन योजना( OPS) हे प्रकरण सुटले तर पेन्शनमध्ये मोठा फायदा होऊ शकतो.


संसदेत प्रश्न उपस्थित केला


पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरून, वित्तीय सेवा विभाग (DFS) आणि कायदा मंत्रालयाला त्या कर्मचाऱ्यांना NPS मधून वगळण्यास सांगितले आहे का, असा प्रश्न संसदेत केंद्रीय मंत्र्यांना विचारण्यात आला. त्यांना जुन्या पेन्शन योजनेत हस्तांतरित करा. या योजनेबाबत समावेश करण्यासाठी सूचना मागविण्यात आल्या आहेत, ज्यांच्या भरतीसाठी 31 डिसेंबर 2003 रोजी किंवा त्यापूर्वी जाहिराती जारी केल्या होत्या.


यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार नाही


केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) यांनी संसदेत सांगितले की, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाला (Central Armed Police Force) जुन्या पेन्शन योजनेचा  (Old pension Scheme) लाभ मिळणार नाही. ते म्हणाले की केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1972 अंतर्गत निमलष्करी कर्मचार्‍यांना पेन्शन आणि इतर लाभ मिळतात.


नवीन पेन्शन योजनेत कमी फायदे 


विशेष म्हणजे जुनी पेन्शन योजनेबाबत राज्यस्तरावरही आंदोलने सुरु आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी एका व्यासपीठावर एकत्र येण्यास सुरुवात केली आहे. 2010 नंतर सरकारने नवीन पेन्शन योजनेंतर्गत  (New Pension Scheme) कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या योजनेत कर्मचाऱ्यांना जुन्या योजनेच्या तुलनेत खूपच कमी लाभ मिळत आहेत.