मुंबई : कोरोना काळात अनेक लोकांनी आपली नोकरी गमावली आहे, तर काही लोकं अर्ध्या पगारावर काम करत आहेत. अशा परिस्थितीत फ्रेशर्स लोकांना त्यांच्या भविष्याची चिंता लागून राहिली आहे. इथे आहे, त्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यात मला कुठे नोकरी मिळणार, असा विचार जर तुमच्या डोक्यात असेल तर तो लगेच काढा, कारण आयटी फ्रेशर्ससाठी नोकरीसंदर्भात एक चांगली बातमी समोर आली आहे. (Infosys hireing 45000 freshers)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर तुमच्यासमोर नोकरीची सुवर्ण संधी चालून आली आहे (Infosys hireing 45000 freshers). खरं तर, देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने बुधवारी सांगितले की, ती या वर्षी कंपनीमध्ये सुमारे 45 हजार फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे. इन्फोसिसकडून ही घोषणा अशा वेळी करण्यात आली, जेव्हा तिचा ऍट्रिशन रेट म्हणजेच कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे आणि आयटी कंपन्यांमध्ये चांगली तंत्रज्ञान प्रतिभावान घेण्याची स्पर्धा आहे.


इन्फोसिसचे सीओओ (UB) प्रवीण राव म्हणाले, "बाजारातील सर्व क्षमतेचा लाभ घेण्यासाठी आम्ही आमच्या कॉलेज ग्रेजुएट हायरिंग प्रोग्राममध्ये उमेदवारांची संख्या वाढवणार आहोत, ज्यामुळे यावर्षी 45 हजार फ्रेशर्स लोकांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. याव्यतिरिक्त, आम्ही आमच्या कर्मचार्‍यांच्या गरजा पूर्ण करण्याचे काम सुरू ठेवणार आहोत, ज्यात आरोग्य आणि वेलनेस उपाय, रिस्किलिंग प्रोग्राम आणि करिअर ग्रोथच्या संधी यांचा समावेश आहे." (Infosys hireing 45000 freshers)


Infosys Q2 Results : नफा 11.9% वाढून 5,421 कोटी रुपये


इन्फोसिसने बुधवारी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे (2021-22) आर्थिक रिपोर्ट जाहीर केले. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 11.9 टक्क्यांनी वाढून 5 हजार 421 कोटी रुपये झाला. यासह, कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 4 हजार 845 कोटी रुपयांचा नफा कमावला होता.


शेअर बाजारांना पाठवलेल्या माहितीमध्ये कंपनीने म्हटले आहे की, तिमाही दरम्यान कंपनीची कमाई 20.5 टक्क्यांनी वाढून 29 हजार 602 कोटी रुपये झाली आहे, जी एक वर्ष आधी याच तिमाहीत 24 हजार 570 कोटी रुपये होती.