NCERT Parakh Report on Class 12 Board Evaluation : विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आगामी काळात 12वीच्या निकालात 9वी, 10वी आणि 11वीचे गुण महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.  NCERT च्या युनिट 'पारख' ने शिक्षण मंत्रालयाला एक अहवाल सादर केलाय. या अहवालात इयत्ता 9, 10 आणि 11 चे गुण इयत्ता 12वीच्या रिपोर्ट कार्डमध्ये जोडण्याची शिफारस करण्यात आलीय. अहवालात असं नमुद करण्यात आलंय, की जर विद्यार्थी 9वी, 10, 11 च्या परीक्षांमध्ये चांगले प्रदर्शन करत असेल आणि त्याची वर्गातील उपस्थिती ही उत्तम असेल तर त्यांना 12वीच्या निकालात याचा फायदा मिळायला हवा.


12वी बोर्डासाठी कोणत्या वर्गाला किती वेटेज?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ग    वेटेज 
9वी  - 15%
10 वी - 20%
11 वी- 25%
12 वी - 40%


'परख' अहवालानुसार, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे परीक्षा रिपोर्ट कार्ड्स, गटचर्चा, प्रकल्प इत्यादींद्वारे सतत वर्गातील मूल्यांकन आणि टर्म एंड परीक्षा यांचं संयोजन असायला पाहिजे. 


इयत्ता 9 वी मध्ये, अंतिम गुणांपैकी 70% फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि 30% समेटिव्ह असेसमेंटमधून घेतले जातील.


हे 10वी वर्गात 50-50% वेटेजवर असायला पाहिजे


इयत्ता 11वी साठी हे प्रमाण अनुक्रमे 40% आणि 60% असायला पाहिजे. 


इयत्ता 12 वी मध्ये, फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे वेटेज 30% पर्यंत कमी केले जाईल आणि 70% अंतिम मार्क्स समेटिव्ह असेसमेंटवर देण्यात येतील.


'पारख'नेही आपल्या शिफारशींमध्ये असं सुचवलंय की...


विद्यार्थी 9वी आणि 10वी मध्ये 40-40 क्रेडिट्स आणि इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये 44-44 क्रेडिट देण्यात यावे. 


इयत्ता 9 वी आणि 10 वी मध्ये, 32 क्रेडिट्स विषय विशिष्ट असतील. जसे की तीन भाषांमध्ये 12 क्रेडिट्स, 4 श्रेय गणितासाठी, 4 विज्ञानासाठी, 4 सामाजिक शास्त्रासाठी असतील. 


बोर्डांनी नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कच्या अनुषंगाने क्रेडिट ट्रान्सफरची प्रणाली विकसित करावी, अशा शिफारसींमध्ये सांगण्यात आलंय.


महाराष्ट्र सरकार काय म्हणाली?


इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, हा अहवाल सर्व शाळा मंडळांना त्यांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आलाय. गेल्या आठवड्यात हरियाणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेची पहिली फेरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत, राज्यांनी वर्गवार कामगिरीचा समावेश करण्यासाठी वेगळ्या दृष्टिकोनासाठी युक्तिवाद केल्याच बोलं जातंय.