HDFC Bank FD Rates : सकाळी सकाळी या बँके ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. जगभरात आज गुरु नानक जयंती (Guru Nanak Jayanti 2022) साजरी करण्यात येतं आहे. आज बँका बंद आहेत तरी या बँकेने खातेधारकांना आनंदाची दिली आहे. जर तुमचं या बँकेत खाते असेल तर तुम्ही लगेचच तुमचं ई-मेल चेक करा.


तुम्हाला आला आहे का ई-मेल? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमचं HDFC Bank खातं असेल तर सकाळी -सकाळी खातेधारकांना बँकेने गिफ्ट दिलं आहे. बँकेने एफडी दर 5.45 टक्क्यांवरून 6.25 टक्के केला आहे. मात्र, हा 6.25 टक्के व्याजदर काही अटींवरच दिला जाणार आहे. बँकेकडून दिवाळीनंतर लवकरच व्याजदर वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती. बँकेच्या या घोषणेचा 2 कोटींपेक्षा कमी एफडी असलेल्यांना याचा लाभ मिळणार आहे. FD च्या नवीन व्याजदरातील बदल बँकेने 26 ऑक्टोबर 2022 रोजी लागू केला होता. (big news hdfc bank hikes fd intrest rates 2022 nmp)


HDFC बँक FD नवीनतम दर  (HDFC Bank FD Latest Rates 2022)


7 ते 14 दिवस - 3 टक्के
15 ते 29 दिवस - 3 टक्के
30 ते 45 दिवस - 3.50 टक्के
46 ते 60 दिवस - 4 टक्के
61 ते 89 दिवस - 4.50 टक्के 
90 दिवस ते 6 महिने - 4.50 टक्के
6 महिने 1 दिवस ते 9 महिने - 5.25 टक्के
9 महिने 1 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी - 5.50 टक्के
1 वर्ष ते 15 महिने - 6.10 टक्के
15 महिने ते 18 महिने - 6.15 टक्के
18 महिने ते 21 महिने - 6.15 टक्के
21 महिने ते 2 वर्षे - 6.15 टक्के
2 वर्षे 1 दिवस - 3 वर्षे - 6.25 टक्के
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे - 6.25 टक्के
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे - 6.20 टक्के


ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक फायदा
 
बँकेच्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे, असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे. यापुढे ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षे मुदतीच्या FD वर 3.5 टक्के ते 6.95 टक्के व्याजदर मिळेल.