नवी दिल्ली : परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे. एव्हिएशन रेग्युलेटर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने जगभरात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवरील बंदीचा कालावधी वाढवला आहे. भारत सरकारने आज आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाण 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याआधी केंद्र सरकारने 31 जानेवारीपर्यंत देशातील सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डीजीसीएने आदेश केले जारी
डीजीसीएने यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. डीजीसीएच्या आदेशानुसार, या आदेशाचा कार्गो आणि डीजीसीएने मान्यता दिलेल्या फ्लाइटवर कोणताही परिणाम होणार नाही. कोविड-19 महामारीमुळे 23 मार्च 2020 पासून भारतातील सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद आहेत. परंतु, जुलै 2020 पासून, सुमारे 28 देशांसोबत एअर बबल करारांतर्गत काही विशेष आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे सुरू आहेत. जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही.


कोरोनाची परिस्थिती भीषण 
काही दिवसांपासून काहीशी घट होणाऱ्या नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा कोविड -19 संसर्गाच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत (मंगळवार सकाळी 8 ते बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत) देशात 2 लाख 82 हजार 970 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी आढळलेल्या नवीन रुग्णांपेक्षा हे प्रमाण 44 हजार 952 रुग्णांनी अधिक आहे.